Katrina Kaif Insulted On Set:  बॉलिवूडमधील (Bollywood) टॅलेंटेड अभिनेत्रींच्या नावाच्या यादीत कतरिनाचं नाव आवर्जुन घेतलं जातं. कतरिना कैफने (Katrina Kaif) 2003 मध्ये 'बूम' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'सरकार' तसेच 'मल्लीस्वरी' या तेलुगुतील हीट चित्रपटांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीला आली. पण तिला खरी प्रसिद्धी 'मैने प्यार क्यूं किया' या चित्रपटातून मिळाली. कतरिना कैफ ही तिच्या अभिनयासह डान्स टॅलेंटसाठी देखील ओळखली जाते आणि प्रेक्षकांच्या पसंतीस देखील उतरते. पण एक वेळ अशी होती की याच डान्समुळे भर सेटवर कतरिनाचा अपमान झाला होता. 


कतरिना कैफने मिड डेला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या अनुभवाबद्दल सांगितले आहे. यावेळी तिनं 'मल्लीस्वरी' चित्रपटाच्या सेटवरील एक किस्सा शेअर केलाय.यावेळी तिनं म्हटलं की, मी एका साऊथ इंडियन चित्रपटाच्या सेटवर होते. बहुतेक तो माल्लिसवरी हा चित्रपट होता. तेव्हा कोणतरी माईकवर म्हटलं होतं की, 'ही मुलगी साधा डान्स नाही करु शकत ही इंडस्ट्रीत काय यश मिळणार'


यावर अशी होती कतरिनाची रिऍक्शन


यावर पुढे कतरिनाने म्हटलं की, तिला डान्स करता येत नाही, हे सुरुवातीला ऐकून फार वाईट वाटलं. मला याबाबत कोणत्याची प्रकारचं दु:ख झालं नव्हतं. ती एक माहिती म्हणून फक्त मी ऐकत होते. त्यामुळे मला माझ्या आजुबाजूचे लोक कसे परावृत्त करायचे याची तेव्हा जाणीव झाली. 


तर मी काहीही करु शकले नसते...


अशी बरीच लोकं आहेत, ज्यांनी मला सांगितलं होतं तू कधीही यशस्वी होणार नाही, तुला कधीही चित्रपटात कास्ट करणार नाही, आम्ही तुला कधीही चित्रपटात कास्ट करणार नाही, आम्ही तुझ्याबरोबर काम करू शकणार नाही असं अनेकांनी सांगितलं होतं. ज्या लोकांनी मला या सगळ्या गोष्टी बोलून दाखवल्या त्या सगळ्यांसोबत मी काम केलं. त्या सर्वांसोबत मी चित्रपट केलेत. जर या लोकांच्या या गोष्टी मनावर घेतल्या असत्या आणि निराश झाले असते किंवा हार मानली असती तर यापैकी काहीही झालं नसतं, असंही कतरिनानं म्हटलं. 


कतरिना कैफने बॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय 'चिकनी चमेली', 'शीला की जवानी', 'कमली' आणि 'काला चष्मा' यांसारख्या हिट डान्समधूनही ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. तिच्या अभिनयासोबतच तिच्या डान्सचे देखील अनेक चाहते असून ती नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते.