Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या आगामी 'जवान' (Jawan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. आता आगामी सिनेमाचं पोस्टर आऊट करत किंग खानने 'आस्क एसआरके' (Ask Srk) या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधला आहे. या सेशनच्या माध्यमातून त्याने चाहत्यांच्या भन्नाट प्रश्नांची त्याच्या हटके अंदाजात उत्तरे दिली आहेत.

Continues below advertisement


'आस्क एसआरके' सेशनदरम्यान एका चाहत्याने शाहरुखकडे मुलगी पटवण्यासाठीच्या टिप्स मागितल्या. यावर उत्तर देत किंग खानने लिहिलं,"सगळ्यात आधी पटवणं बोलणं बंद करा.. ते ऐकायला चांगले वाटत नाही". तर दुसऱ्या एका चाहत्याने विचारलं की,"जवान' हा सिनेमा अॅक्शन व्यतिरिक्त कोणत्या कॅटेगरीत जाऊ शकतो". यावर उत्तर देत किंग खान म्हणाला,"भावनिक नाट्य". 










'जवान'मध्ये शाहरुखचा रोमॅंटिक मोड?


एका चाहत्याने लिहिलं आहे,"एक व्यक्ती म्हणून शाहरुख तू मला आवडतोस? 'जवान' सिनेमात तुझा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळेल का?". यावर मजेशीर उत्तर देत किंग खानने लिहिलं आहे,"सर्व बाजूंनी... समोरून... मागून... बाजूने... तुम्ही मला पूर्णपणे 3D IMAX वर्जनमध्ये पाहाल. काळजी करू नका". शाहरुखच्या एका चाहत्याने सेशनदरम्यान लिहिलं आहे,"कृपया शिव्या दे पण उत्तर तरी दे". यावर किंग खान म्हणाला,"तेरी बात का बैदा मारूं". मी जॅकी श्रॉफकडून हे शिकलो आहे". 


शाहरुखच्या 'जवान'चं नवं पोस्टर आऊट!


शाहरुख खानच्या आगामी 'जवान' या सिनेमाचं नवं पोस्टर आता आऊट झालं आहे. या पोस्टरमध्ये तो नयनतारा आणि विजय सेतुपतीसोबत एकाच फ्रेममध्ये दिसत आहे. शाहरुखने नवं पोस्टर शेअर करत खास कॅप्शनही लिहिलं आहे. 'जवान' हा बहुचर्चित सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. शाहरुखची चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.






संबंधित बातम्या


Shah Rukh Khan : "माझ्यासोबत सिगरेट ओढायला येणार का?" चाहत्याचा शाहरुखला थेट प्रश्न; किंग खानच्या उत्तरानं वेधलं लक्ष