Kangana Ranaut Post : कंगनाला मुळातच बाॅस लेडी म्हणून ओळखले जाते. कोणत्या ना कोणत्या कारणाने ती कायमच चर्चेत असते. कोणताही राजकीय, सामाजिक मुद्दा सोशल मीडियावर व्हायरल होणारी एखादी पोस्ट कंगना त्यावर आवर्जून बिनधास्तपणे व्यक्त होते. सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. त्याचबरोबर ती सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना नाव न घेता टार्गेट करत असते.
अशात कंगनाने स्वत:चे नाव गुगलवर टाकून पाहिले. नाव टाकल्यानंतर नेमकी काय माहिती आली ही तिने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर करत सांगितले आहे. कंगनाने या पोस्टद्वारे तिच्याबद्दल ‘गुगल’ या सर्च इंजिनवर दाखवल्या जाणाऱ्या माहितीवर आक्षेप घेतला आहे. इतर कलाकारांविषयी जेव्हा गुगलवर सर्च केलं जातं, तेव्हा त्यांच्या कामाविषयी माहिती दिसते, मात्र स्वत:विषयी केलं तर वेगळंच काहीतरी दिसतं, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलंय.
काय आहे कंगनाची पोस्ट
"दुसऱ्या अभिनेत्रींविषयी गुगलवर काही सर्च केले तर , त्यांच्या कामाबद्दल तसेच त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्स बद्दलची माहिती दिसते आणि माझ्या (अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शिक, निर्माती असूनही) गुगल पेजवर दहा वर्षांपूर्वी कोणी काय म्हटलं होतं किंवा दहा वर्षांपूर्वी मी केलेल्या वक्तव्याचा काय अर्थ आहे हे सर्व दिसतंय. ही माझ्या आजच्या दिवसाची स्टोरी" असे तिने लिहिले आहे.
कंगना लवकरच 'चंद्रमुखी 2' या आगामी सिनेमात दिसणार आहे. 'चंद्रमुखी 2' या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री पहिल्यांदाच राघव लॉरेन्स सोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. कंगनाच्या शाही अंदाजाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांची सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. 'चंद्रमुखी 2' हा सिनेमा 2005 मध्ये आलेल्या पी. वासु दिग्दर्शित सिनेमाचा सीक्वेल आहे. या सिनेमात रजनीकांत आणि ज्योतिका मुख्य भूमिकेत झळकले होते. आता प्रेक्षकांना 'चंद्रमुखी 2' या सिनेमाचा सीक्वेल आहे. तामिळ, हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
'चंद्रमुखी 2' कधी होणार रिलीज? (Chandramukhi 2 Released Date)
'चंद्रमुखी 2' या थरार नाट्य असलेल्या विनोदी सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. पी. वासु यांनी या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. कंगना रनौतसह या सिनेमात वडिलेलू, सृष्टी डांगे आणि लक्ष्मी मेनन देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा 19 सप्टेंबर 2023 रोजी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.