मुंबई : मी रंगाने सावळी होते. त्यामुळे मला सगळे कुरुप म्हणायचे. माझ्या रंगामुळे मला कुरुप म्हटलं जातं हे मला कळलं ते वयाच्या 12 व्या वर्षी. खरंच सांगते, असं मला संबोधायला सुरुवात झाली आणि मी आवाक झाले. अनेकांना खोटं वाटेल, पण सगळी माझ्यापेक्षा वयाने मोठी असलेली, अगदी प्रौढ मंडळी मला माझ्या रंगामुळे हिणवायची असा गौप्यस्फोट केला आहे, बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानची मुलगी सुहाना खानने.


आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ती नेहमी आपले फोटो टाकत असते. शाहरूख खानची मुलगी असूनही तिने आपल्याला हवं ते केलं आहे. आपल्याला हवे तसे फोटो टाकून ती चर्चेत राहीली आहे. पण आता मात्र तिने केलेली पोस्ट चांगलीच व्हायरल होते आहे. कारण, आता तिने तिच्या वाट्याला आलेला एक किस्सा शेअर केला आहे. सुहाना अवघ्या 12 वर्षाची असताना तिला तिच्या रंगावरून चिडवलं जायचं. ती म्हणते, 'मी रंगाने सावळी होते. खरंतर मला माझ्या रंगाचं काहीच वाकडं नव्हतं. मला माझा त्वचेचा रंग खूपच आवडतो. तो सावळा आहे. ब्राऊन आहे. पण माझा रंग ब्राऊन आहे म्हणून मला कुरुप म्हटलं जायचं. अत्यंत समंजस पुरुषांकडूनही मलाा अशा कमेंट्स ऐकायला मिळाल्या आहेत.'


तिने आपला एक क्लोज अप इन्स्टावर शेअर केला आहे. त्यात तिच्या चेहऱ्यावर एक प्रकाश झोत आल्यामुळे तिचा चेहरा पुरता उजळलेला दिसतो. पण त्यात तिने पोस्ट शेअर केली आहे. ती म्हणते, नाही.. मी माझा रंग बदलणार नाही. तिच्या या पोस्टचं बरंच कौतुक होतं आहे. सुहाना ही शाहरूख खानची मुलगी म्हणून नेहमीच चर्चेत असते. ती सातत्याने वेगवेगळ्या कारणाने चर्चेचा विषय बनते. कधी तिने घातलेले कपडे चर्चेत येतात. तर कधी तिने काढलेल्या फोटोची चर्चा होते. पण आता मात्र तिने आपल्या रंगावरून हिणवलं जाणं सार्वजनिक केलं आहे. शाहरुख खान आणि गौरी खानची ही मुलगी असून तिला अशा प्रकारे हीन कमेंट्सना सामोरं जावं लागत असेल तर इतरांचं काय होत असेल अशी चर्चाही या निमित्ताने सुरू झाली आहे.





गेल्या काही दिवसांपासून स्टार्स आणि त्यांची मुलं चर्चेत आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर नेपोटिझमवर आलेली संशयाची सुई पाहता प्रत्येक स्टार्सची मुलं नेमकी काय करतायत आणि त्यांना कसा ब्रेक मिळतोय याकडे माध्यमांसह अनेकांचं लक्ष आहे. म्हणून गेल्या काही महिन्यांपासून करण जोहरने आपल्या मुलांचे फोटो वा व्हिडिओ टाकलेले नाहीत. अलिया, वरूणसह सगळीच स्टारकिडस गप्प आहेत. अशात सुहानाने केलेली ही पोस्ट ही व्हायरल होत असेल तर त्यात नवल नाही. कारण, हा अनुभव प्रत्येक स्त्रीला कमी जास्त फरकाने येतच असतो.


संबंधित बातम्या :