The Kerala Story: 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) हा चित्रपट काल (5 मे) प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. 'द केरळ स्टोरी' या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी काही जण करत आहेत. या चित्रपटाला काही लोक विरोध करत आहेत तर काही लोक या चित्रपटाला पाठिंबा देत आहेत. आता बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) यांनी 'द केरळ स्टोरी' या चित्ररटाला ट्वीट शेअर करुन सपोर्ट केला आहे.
शबाना आझमी यांचे ट्वीट
'जे लोक द केरळ स्टोरीवर बंदी घालण्याची चर्चा करतात ते आमिर खानच्या लाल सिंग चड्ढावर बंदी घालू पाहणाऱ्यांइतकेच चुकीचे आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने एकदा चित्रपट पास केला की, तर कोणालाच एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी होण्याचा अधिकार नाही' असं शबाना आझमी यांनी ट्वीट केलं आहे. त्यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बानी, सिद्धी इदनानी यांनी 'द केरळ स्टोरी' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केलं आहे. काही लोक या चित्रपटाचं कौतुक करत आहेत, तर काही लोक या चित्रपटाला विरोध करत आहेत.
'द केरळ स्टोरी' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सुदीप्तो सेन यांनी सांभाळली आहे. काँग्रेससह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची युवा शाखा DYFI आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) च्या युथ लीगने या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली.
लाल सिंह चढ्ढा रिलीज झाल्यानंतर देखील या चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी काही लोक करत होते. आता द केरळ स्टोरी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी काही लोक करत आहेत. पण द केरळ स्टोरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रिलीजच्या तीन दिवसांत या सिनेमाने 35.75 कोटींची कमाई केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
The Kerala Story: द केरळ स्टोरीमधील 'त्या' सिन्सचं शूटिंग कसं झालं? सिनेमॅटोग्राफर म्हणाले...