The Kerala Story:   'द केरळ स्टोरी' (The Kerala Story)  हा चित्रपट काल (5 मे)  प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. चित्रपटाच्या कथानकाची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. आता आज तकला दिलेल्या मुलाखतीमध्ये द केरळ स्टोरी या चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर   प्रशांतनु महापात्रा (Prashantanu Mohapatra) यांनी या चित्रपटाचं शूटिंग कसं झालं? याबाबत सांगितलं आहे.

प्रशांतनु महापात्रा म्हणाले, ' द केरळ स्टोरी या चित्रपटातील शालिनीसोबत टेंटमध्ये सतत बलात्कार होत आहे, असं एका सिनमध्ये  दाखवण्यात आलं होतं. आम्ही तो सिन प्रतिकात्मक पद्धतीने मांडला. आम्ही टेंटमधील लाईटच्या मदतीने बलात्काराची ती कृती शूट केली कारण ते दृश्य त्रासदायक होते.'

'नीमाच्या भूमिकेसोबत होणाऱ्या बलात्काराचा सिन दाखवता आम्ही पीडित आणि बलात्कारी यांना एकत्र दाखवलं नाही. आम्ही दोन्ही पात्र वेगळे केले. एकीकडे फ्रेममध्ये फक्त मुलगा दाखवून त्याचा उन्माद दाखवला आहे, तर दुसरीकडे मुलीची असहायता दुसऱ्या फ्रेममध्ये दाखवली आहे.' असंही प्रशांतनु महापात्रा यांनी सांगितलं.

10 ते 12 तास शूटिंग केले

पुढे प्रशांतनु महापात्रा म्हणाले, 'सीरिया आणि अफगाणिस्तानची सीमा दाखवण्यासाठी आम्ही लडाखच्या खोऱ्यात  शूटिंग केले. आम्ही 15 दिवस रोज 10 ते 12 तास शूटिंग करत होतो. हिमवर्षाव होण्याच्या काही तास आधी आम्ही शूट केले. एका सीनमध्ये शालिनी कॅम्पमधून पळत आहे, हे दाखवायचे होते तेव्हा मीही कॅमेरा हातात घेऊन पळत होतो. आणखी एक सीन आहे, जिथे मुलगी आत्महत्या करते, असं दाखवायचे होते. त्यामध्ये तिचा लटकलेला पाय दाखवायचा होता, ते अवघड होते. चित्रपटात एक असा सिन आहे, ज्यामध्ये शालिनी आपल्या कारमधून खाली उतरते आणि तेथील मृतदेह पाहते. इथे आम्ही मृतदेहांचे क्लोज-अप शॉट्स घेतले नाहीत.'

अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बानी, सिद्धी इदनानी यांनी 'द केरळ स्टोरी' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.  या चित्रपटाचं दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या:

The Kerala Story Twitter Review: ‘द केरळ स्टोरी’ जिंकतोय प्रेक्षकांची मनं; चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक म्हणतायत, 'प्रपोगंडा नाही तर...'