Parineeti Chopra Raghav Chadha : आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा (Raghav Chadha) आणि  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) यांच्या नात्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यातील आयपीएल 2023 (IPL 2023) चा सामना पाहण्यासाठी राघव चढ्ढा आणि परिणीती हे गेले होते. आता राघव आणि परिणीती हे डिनर डेटला गेले होते, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. राघव चढ्ढा आणि परिणीती हे एका रेस्टॉरंटमध्ये स्पॉट झाले आहेत. 


राघव चढ्ढा आणि परिणीती यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी  परिणीती ही ऑल ब्लॅक आऊट फिट आणि व्हाईट शू अशा लूकमध्ये दिसली. राघव चढ्ढा आणि परिणीती यांच्या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, 'एक फोटोग्राफर परिणीतीला विचारतो, तू लग्न कधी करणार आहेस?'राघव चढ्ढा आणि परिणीती यांनी त्यांच्या नात्याबाबत अजून कोणतीही माहिती चाहत्यांना दिलेली नाही. 


पाहा व्हिडीओ






डेटिंगच्या चर्चेबाबत काही दिवसांपूर्वी राघव चढ्ढा यांना विचारण्यात आलं. त्यावेळी आपचे नेते राघव चढ्ढा यांनी एबीपी न्युजला सांगितलं, 'मला राजकारणाबाबत विचारा, परिणीतीबाबत नाही.'


परिणीतीला एका मुलाखतीमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चेबाबत विचारण्यात आलं. यावेळी ती म्हणाली, 'मीडियाच्या माध्यमातून माझ्या वैयक्तिक जीवनाबाबत चर्चा केली जात आहे. कधी-कधी मार्यादा ओलांडून लोक पर्सनल गोष्टींबाबत चर्चा करतात. याला तुम्ही अपमान समजू शकता! चर्चा करणं आणि आपमान करणं यामध्ये एक लहान रेष आहे. एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण मला द्यावं लागत असेल तर मी देणार नाही.'  


परिणीतीचे चित्रपट


इश्कजादे, शुद्ध देसी रोमान्स, हसी तो फसी, दावत-ए-इश्क यांसारख्या हिट चित्रपटांमधून परिणीतीनं काम केलं. काही दिवसांपूर्वी तिचा कोडनेम तिरंगा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. परिणीतीचे चाहते तिच्या चित्रपटांची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Parineeti Chopra Raghav Chadha : 'आप' चे नेते राघव चढ्ढा आणि परिणीतीनं एकत्र पाहिली आयपीएल मॅच; फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले, 'जेव्हा राजकारण आणि बॉलिवूड....'