Serum Institute Stakes in Dharma Production : कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लस बनवणारी कंपनी सीरम इंस्टिट्युटचे सर्वेसर्वा अदर पुनावाला बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या कंपनीमध्ये हिस्सेदारी विकत घेणार आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनमध्ये अदर पुनावाल 50 टक्के भागीदारी विकत घेणार आहे. अदर पुनावाला आणि धर्मा प्रोडक्शनमधील ही डील 1000 कोटी रुपयांना होणार असल्याची माहिती आहे. वॅक्सिन मेकर सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला आता बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री करणार आहे. धर्मा प्रोडक्शन फिल्म इंडस्ट्रीमधील मोठी कंपनी आहे, त्यामुळे त्यात हिस्सेदारी घेत आता अदर पुनावाला फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.
सीरम इंस्टिट्युटचे CEO अदर पुनावालांची बॉलिवूडमध्ये गुंतवणूक
अदार पूनावालाने करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनमध्ये मोठा हिस्सा मिळविण्याच्या शर्यतीत रिलायन्स आणि सारेगामा कंपन्यांना मागे टाकलं आहे. धर्मा प्रॉडक्शन हाऊसने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, अदर पूनावालाच्या सेरेन एंटरटेनमेंटने धर्मा प्रोडक्शनमधील 50 टक्के स्टेक 1000 कोटींना विकत घेतला आहे. उर्वरित 50 टक्के मालकी करण जोहरकडे राहील. अदर पूनावाला यांच्या नेतृत्वाखालील सेरेन एंटरटेनमेंटने करण जोहरच्या मालकीच्या धर्मा प्रॉडक्शनचा 50 टक्के भागाची मालकी मिळवली आहे.
करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन्सचे 50 टक्के शेअर्स विकत घेणार
अदार पूनावालाच्या नेतृत्वाखालील सेरेन प्रॉडक्शन करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन आणि धर्माटिक एंटरटेनमेंटमधील 50 टक्के हिस्सेदारी विकत घेणार आहे. अदर पुनावाला आणि धर्मा प्रोडक्शन यांच्यात 1000 कोटी रुपयांना डील होणार असल्याचं कंपनीने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. करण जोहरकडे धर्मा प्रोडक्शनमधील शिल्लक 50 टक्के हिस्साच्या मालकी हक्क असेल. याशिवाय करण जोहर कंपनीचा सीईओ (Chief Executive Officer) म्हणून कायम राहील. अपूर्व मेहता मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कायम राहील.