Shraddha Kapoor Entry in Pushpa 2 : स्त्री 2 चित्रपटामुळे अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या प्रसिद्धीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या चित्रपटाच्या यशामुळे तिला वेगळच स्टारडम मिळालं आहे. श्रद्धा कपूरचे फक्त भारतातच नाही, तर जगभरात लाखो-कोट्यवधी चाहते आहेत. श्रद्धा कपूरच्या चाहत्यांसाठी आता एक खूशखबर आहे. मीडिया रिपोर्टनुसार, श्रद्धा कपूरची अल्लू अर्जून स्टारर पुष्पा 2 चित्रपटामध्ये एन्ट्री झाल्याची माहिती आहे. श्रद्धा कपूर अल्लू अर्जूनच्या आगामी 'पुष्पा 2 : द रुल' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती अल्लू अर्जूनसोबत डान्स करताना दिसू शकते. 


पुष्पा 2 मध्ये श्रद्धा कपूरची एन्ट्री


सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या बहुप्रतिक्षित पुष्पा 2 : द रुल चित्रपटामध्ये बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर एका खास गाण्यात दिसणार आहे, अशी बातमी 123 तेलुगूने दिलं आहे. दरम्यान अल्लू  अर्जून किंवा चित्रपट निर्मात्यांकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, मात्र या घोषणेची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटात अल्लू अर्जूनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आणि फहद फासिल खलनायकाच्या भूमिकेत आहे. बहुचर्चित आगामी पुष्पा 2 चित्रपट 6 डिसेंबरला रिलीज होणार आहे.


 






'पुष्पा 2' मध्ये श्रद्धा कपूर करणार आयटम साँग?


123 तेलुगुच्या रिपोर्टनुसार, श्रद्धा कपूर अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 चित्रपटात दिसणार आहे. मात्र, या चित्रपटाच्या निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. स्त्री 2 चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाल्यानंतर अभिनेत्री श्रद्धा कपूर चर्चेत आहे. त्यानंतर श्रद्धा पुष्पा 2 चित्रपटात दिसली तर चाहते खूप खूश होतीस. पुष्पा चित्रपटात समंथा रुथ प्रभूने ऊ अंटावा ऊउ अंतवा गाण्यावर आयटम डान्स केला होता, जो खूप व्हायरल झाला होता. या गाण्याने आणि समांथाच्या डान्स मूव्ह्सने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली. आता निर्माते पुष्मा 2 साठी आणखी धमाकेदार आयटम साँग आणण्याचा विचारात आहेत.