एक्स्प्लोर

'ठाकरे' सिनेमा सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात

सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील तीन दृश्य आणि काही संवादांवर आक्षेप घेतला आहे. सेन्सॉर बोर्डाच्या आक्षेपानंतर चित्रपटाचा ट्रेलर ठरल्याप्रमाणे वेळेतच लॉन्च होणार असल्याची रोखठोक भूमिका खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे.

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनप्रवासावर आधारित बहुचर्चित 'ठाकरे' सिनेमाचा ट्रेलर आज दुपारी दीड वाजता लॉन्च होणार आहे. मात्र ट्रेलर लॉन्च पूर्वीच हा सिनेमा वादात सापडला आहे. सिनेमातील काही दृश्य आणि संवादावर सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतला आहे.

ठाकरे सिनेमातील तीन दृश्य आणि काही संवादांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. सेन्सॉर बोर्डाच्या आक्षेपानंतर चित्रपटाचा ट्रेलर ठरल्याप्रमाणे वेळेतच लॉन्च होणार असल्याची रोखठोक भूमिका खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. त्यामुळे सेन्सॉर बोर्ड आणि शिवसेना समोरासमोर आल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भाषणाची आपली खास शैली होती. बाळासाहेब अनेकदा आपल्या भाषणात शिवराळ भाषेचा वापर करत असे. 'ठाकरे' सिनेमातही बाळासाहेबांच्या भाषणाची काही दृश्ये आहेत, त्या भाषेवर सेन्सॉर बोर्डनं आक्षेप घेतल्याचं बोललं जात आहे.

याशिवाय वादग्रस्त बाबरी मशिद प्रकरणीही काही दृश्य सिनेमात दाखवण्यात आली आहेत. बाबरी मशिद प्ररकणातील या दृश्यांमुळे आगामी काळात वाद निर्माण होऊ शकतो. हा वाद निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून म्हणून सेन्सॉर बोर्डानं या आशयाच्या काही दृश्यांवर आक्षेप घेतल्याची माहिती सूत्रांककडून मिळत आहे.

शिवसेना आणि सेन्सॉर बोर्ड यांच्यात या मुद्द्यांवरुन चर्चा सुरु आहे. मात्र शिवसेनेचा आक्रमक पवित्रा पाहता सेन्सॉर बोर्डाने घेतलेल्या आक्षेपांना शिवसेना जुमानणार का? आणि सिनेमातील दृश्यांवर कात्री लागणार का?  हे पाहावं लागणार आहे.

‘ठाकरे’ या सिनेमाचा ट्रेलर आज, 26 डिसेंबर रोजी कार्निव्हल आयमॅक्स वडाळा येथे प्रदर्शित होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शानदार सोहळा रंगणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Actress Asha Singh Passes Away: 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; शेवटच्या श्वासापर्यंत गंभीर आजाराशी झुंज, 'महाभारतात' साकारली होती भूमिका
90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; शेवटच्या श्वासापर्यंत गंभीर आजाराशी झुंज, 'महाभारतात' साकारली होती भूमिका
Govinda legal Action: दुसरं लग्न अन् घटस्फोटाच्या चर्चांना कंटाळला अभिनेता; गोविंदाने उचललं ठोस पाऊल, घेतला मोठा निर्णय
दुसरं लग्न अन् घटस्फोटाच्या चर्चांना कंटाळला अभिनेता; गोविंदाने उचललं ठोस पाऊल, घेतला मोठा निर्णय
Shweta Tiwari MNS Shalini Thackeray: राज ठाकरेंचं नाव घेत श्वेता तिवारी आक्रमक बोलली; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, शालिनी ठाकरे म्हणाल्या...
राज ठाकरेंचं नाव घेत श्वेता तिवारी आक्रमक बोलली; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, शालिनी ठाकरे म्हणाल्या...
Govinda Spotted Outside Hospital: चेहऱ्यावर मास्क अन् चिंता, पापाराझींना केलं इग्नोर; गोविंदा हॉस्पिटलबाहेर झाला स्पॉट, नेमकं झालं काय?
चेहऱ्यावर मास्क अन् चिंता, पापाराझींना केलं इग्नोर; गोविंदा हॉस्पिटलबाहेर झाला स्पॉट, नेमकं झालं काय?

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
Embed widget