एक्स्प्लोर

मी टू प्रकरण : ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

या प्रकरणी सरकारी वकील यांनी उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागून घेतल्याने कोर्टाने 20 डिसेंबरपर्यंत सुनावणी स्थगित केली. लेखिका विनता नंदा यांनी आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता.

मुंबई : बॉलिवूडचे संस्कारी बाबूजी म्हणून ओळख असणारे ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांनी अटकपूर्व जामिनासाठी दिंडोशी कोर्टात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आज (शुक्रवारी) सुनावणी झाली. या प्रकरणी सरकारी वकील यांनी उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागून घेतल्याने कोर्टाने 20 डिसेंबरपर्यंत सुनावणी स्थगित केली. लेखिका विनता नंदा यांनी आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. अभिनेत्री तनुश्री दत्ताने 'मी टू' मोहीम छेडल्यानंतर देशभरात विविध क्षेत्रातील महिलांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली होती. लेखिका विनता नंदा यांनीही कैक वर्षांपूर्वीची आपबिती फेसबुक पोस्टच्या माध्यमातून 8 ऑक्टोबरला सर्वांसमोर मांडली होती. आलोकनाथ यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेत्री हिमानी शिवपुरी, संध्या मृदुल यांनीही केला. त्याचप्रमाणे आलोकनाथांचा हा चेहरा माहित असल्याची कबुलीही अनेक कलावंतांनी दिली होती. अगदी 'तारा'फेम अभिनेत्री नवनीत निशान यांनीही आरोपांना दुजोरा दिला. 'सिन्टा' या मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांचे प्रश्न मांडणाऱ्या असोसिएशननेही आलोकनाथ यांना नोटीस पाठवली होती. 'संस्कारी बाबूजी' अशी ओळख असलेल्या आलोकनाथ यांचा वेगळा चेहरा समोर आल्याने चाहतेही अवाक झाले होते. विनता नंदा यांच्या आरोपांनंतर जवळपास दीड महिन्यांनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दरम्यानच्या काळात आलोकनाथ यांनी विनता यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला होता. विनता नंदा यांची फेसबुक पोस्ट 'त्याची पत्नी माझी बेस्ट फ्रेंड होती. आमचं एकमेकांच्या घरी येणं-जाणं होतं. मी तारा नावाची मालिका लिहित होते. तो माझ्या मालिकेतील नायिकेच्या मागे होता. तो दारुडा, निर्लज्ज होता, मात्र त्या दशकातील स्टार होता. माझ्या नायिकेला तो सेटवर त्रास द्यायचा, पण सगळे मूग गिळून गप्प होते. तिने आमच्याकडे तक्रार केली तेव्हा आम्ही त्याला काढून टाकायचा निर्णय घेतला. दोघांमध्ये शेवटचा सीन शूट करुन त्याला नारळ दिला जाणार होता, पण त्याला कुणकुण लागली. त्याच दिवशी तो दारु पिऊन सेटवर आला. शॉटला बोलवेपर्यंत तो पित बसला. कॅमेरा रोल होताच तो नायिकेच्या अंगचटीला आला. तिने त्याला कानफटात लगावली. मी सांगितलं, यापुढे तू आमच्या कोणत्याही मालिकेत दिसणार नाहीस. नंतर मित्रांच्या मध्यस्थीमुळे आम्ही पुन्हा बोलायला लागलो' असं विनता नंदांनी लिहिलं होतं. 'त्या व्यक्तीने (अलोकनाथ) आपल्या घरी आयोजित केलेल्या पार्टीला मी गेले होते. काही मित्रही तिथे होते. माझ्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळलं आहे, असं मला वाटत होतं. मला जरा वेगळंच जाणवायला लागलं. रात्री दोनच्या सुमारास मी पार्टीतून निघाले, पण कोणीच मला घरी सोडायला येण्याची तयारी दाखवली नाही, हे मला जरा विचित्रच वाटलं. तिथे फार काळ थांबणं मला ठीक वाटत नव्हतं, त्यामुळे घर लांब असूनही मी पायी जाण्याचं ठरवलं' असं विनता यांनी पुढे लिहिलं होतं. 'अर्ध्या रस्त्यात असताना त्याने (अलोकनाथ) माझ्याजवळ गाडी थांबवली आणि मला घरी सोडण्याचं आश्वासन दिलं. त्याच्यावर विश्वास ठेवून मी गाडीत बसले. त्यानंतर नेमकं काय झालं हे मला अंधुक आठवतंय. पण माझ्यावर दारु उडवली जात होती आणि माझं लैंगिक शोषण केलं जात होतं. मी दुसऱ्या दिवशी झोपेतून उठले, तेव्हा वेदनेची जाणीव झाली. माझ्यावर फक्त बलात्कार झाला नव्हता, तर माझ्याच घरात माझ्यावर भीषण अत्याचाराचा झाले होते' असा दावा विनता यांनी केला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Bajpayee On FDA Chief Tukaram Mundhe: 'कर्तव्य बजावणं हा चर्चेचा विषय का?'; मनोज वाजपेयींचं तुकाराम मुढेंच्या धडक कारवायांवर मोठं वक्तव्य
'कर्तव्य बजावणं हा चर्चेचा विषय का?'; मनोज वाजपेयींचं तुकाराम मुढेंच्या धडक कारवायांवर मोठं वक्तव्य
Mandana Karimi Shift India To Dubai: 16 वर्ष भारतात राहिली अन् आता दुबईला शिफ्ट झाली; व्हिडीओतून प्रसिद्ध अभिनेत्रीचे धक्कादायक आरोप, म्हणाली, 'पैसे देऊन माझ्यावर नजर ठेवतायत...'
16 वर्ष भारतात राहिली अन् आता दुबईला शिफ्ट झाली; व्हिडीओतून प्रसिद्ध अभिनेत्रीचे धक्कादायक आरोप, म्हणाली, 'पैसे देऊन माझ्यावर नजर ठेवतायत...'
Toxic Box Office Collection Day 9: 500 कोटींचा खर्च, पण 50% बजेटही वसूल करू शकला नाही सुपरस्टार यशचा 'टॉक्सिक'; 9व्या दिवसाचं हादरवणारं कलेक्शन, आतापर्यंतची कमाई किती?
500 कोटींचा खर्च, पण 50% बजेटही वसूल करू शकला नाही सुपरस्टार यशचा 'टॉक्सिक'; 9व्या दिवसाचं हादरवणारं कलेक्शन, आतापर्यंतची कमाई किती?
Deeol Band 3 Update Pravin Tarde: 'देऊळ बंद'चा तिसरा पार्ट अमेरिकेत! श्री स्वामी समर्थांची भक्ती थेट परदेशात गाजणार; लेटेस्ट अपडेट समोर
'देऊळ बंद'चा तिसरा पार्ट अमेरिकेत! श्री स्वामी समर्थांची भक्ती थेट परदेशात गाजणार; लेटेस्ट अपडेट समोर

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: चिमुकल्याकडून मगात पाणी घेत अन् साबण लावून चक्क सापाचं सर्व्हिसिंग! व्हिडिओ पाहून अनेकांना घामटा फुटला
Video: चिमुकल्याकडून मगात पाणी घेत अन् साबण लावून चक्क सापाचं सर्व्हिसिंग! व्हिडिओ पाहून अनेकांना घामटा फुटला
Nepal : नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं-VIDEO
नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं
कुर्डूस गावातील विहिरीवरची दहीहंडी, तरुणाईचा उत्साह, गोविंदांची उंचच उंच उडी; जिल्ह्यातील नागरिकांचे आकर्षण
कुर्डूस गावातील विहिरीवरची दहीहंडी, तरुणाईचा उत्साह, गोविंदांची उंचच उंच उडी; जिल्ह्यातील नागरिकांचे आकर्षण
Sonam Wangchuk: 'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
Mumbai Metro 3: मुंबईकरांसाठी गुड न्यूज, गणेशोत्सवात कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो-३ मार्गाची सेवा मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरु राहणार
गुड न्यूज, गणेशोत्सवात मुंबई मेट्रो लाईन-३ची सेवा मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरु राहणार, MMRC चा मोठा निर्णय  
Dahihandi 2026: मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
Gold Chain Lost: केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
कर्जाच्या परतफेडीवरून महिलेचे अपहरण करून मारहाण, घरी बोलावून ओलीस ठेवलं, नग्न करून व्हिडिओ सुद्धा चित्रित; भयंकर कटात दोन महिला सुद्धा सामील
कर्जाच्या परतफेडीवरून महिलेचे अपहरण करून मारहाण, घरी बोलावून ओलीस ठेवलं, नग्न करून व्हिडिओ सुद्धा चित्रित; भयंकर कटात दोन महिला सुद्धा सामील
Embed widget