FIPRESCI: आपल्या देशात दरवर्षी वीसपेक्षा जास्त भाषांतील चित्रपटांची निर्मिती होत असते. विविध विषयांवरील चित्रपट प्रेक्षकांना बघायला आवडतात. भारतीय भाषांमधील सर्वकालिन सर्वोत्कृष्ट दहा चित्रपटांची निवड करणे अतिशय अवघड गोष्ट आहे. हे काम आता FIPRESCI या संस्थेनं केलं आहे. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटीक्स अर्थात FIPRESCI या संस्थेनं सर्वकालिन सर्वोत्कृष्ट दहा भारतीय चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. ही यादी शुक्रवारी (21 ऑक्टोबर) जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये एकही मराठी चित्रपटाचा समावेश नसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
FIPRESCI या संस्थेनं सर्वकालिन सर्वोत्कृष्ट दहा भारतीय चित्रपटांची निवड करण्यासाठी तीस सदस्यांनी गुप्तपणे मतदान केले. त्यानंतर सर्वकालिन सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये चार बंगाली, चार हिंदी, एक मल्याळम आणि एक कन्नड चित्रपटाचा समावेश आहे.
दहा सर्वकालिन सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटांची यादी-
1) 'पथेर पांचाली'-
पथेर पांचाली हा चित्रपट 1955 मध्ये प्रदर्शित झाली. या चित्रपटाचं दिग्दर्शन सत्यजित रे यांनी केले आहे. अनेक चित्रपट समीक्षक या चित्रपटाचं आजही कौतुक करतात.
2) 'मेघा धाका तारा' -
ऋत्विक घटक दिग्दर्शित मेघा धाका तारा हा चित्रपट 1960 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटातील अभिनेत्री सुप्रिया देवी यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
3) भुवन शोम-
मृणाल सेन दिग्दर्शित भुवन शोम हा हिंदी चित्रपट 1969 मध्ये दिग्दर्शित झाला.
4) एलिप्पाथायम-
एलिप्पाथायम या चित्रपटाचं दिग्दर्शन अदूर गोपालकृष्ण यांनी केलं. हा मल्याळम भाषेतील चित्रपट 1981 मध्ये प्रदर्शित झाला.
5) 'घटश्राध्द'
गिरीश कासारवल्ली यांनी दिग्दर्शित केलेला 'घटश्राध्द ' हा कन्नड चित्रपट 1977 मध्ये प्रदर्शित झाला.
6) 'गरम हवा' ( हिंदी चित्रपट. १९७३.)
1973 मध्ये रिलीज झालेल्या 'गरम हवा' या चित्रपटाचं दिग्दर्शन एम. एस. सत्थू यांनी केले. या चित्रपटात बलराज साहनी, फारुख शेख, गीता सिद्धार्थ या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या.
7) 'चारुलता'
सत्यजित राय दिग्दर्शित हा बंगाली चित्रपट 1964 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात सौमित्र चटर्जी, माधबी मुखर्जी यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली
8) 'अंकूर '
श्याम बेनेगल दिग्दर्शित अंकूर हा हिंदी चित्रपट 1974 मध्ये प्रदर्शित झाला. अनंत नाग,शबाना आझमी यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.
9) 'प्यासा '
गुरुदत्त दिग्दर्शित प्यासा हा चित्रपट 1956 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाची निर्मती, पटकथा लेखन हे देखील गुरुदत्त यांनी केलं असून या चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका देखील साकारली आहे.
10) 'शोले'
1975 साली प्रदर्शित झालेला शोले हा चित्रपट आजही सिनेप्रेमी आवडीनं बघतात. बॉलिवूडमधील आयकॉनिक चित्रपटांपैकी एक असणारा शोले हा चित्रपट 1975 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन रमेश सिप्पी यांनी केले. अमिताभ बच्चन, धमेंद्र, हेमा मालिनी अशी तगडी स्टार कास्ट असणाऱ्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.
इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटीक्स या संस्थेनं ही यादी आता चर्चेचा विषय ठरत आहे. या यादीमध्ये एकही मराठी चित्रपट नसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: