Shahrukh Khan's Mannat Room Rent : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) अनेकदा त्याच्या 'मन्नत' (Mannat) या बंगल्यामुळे चर्चेत येतो. 'मन्नत' हा किंग खानचा आलिशान बंगला आहे. शाहरुखचे चाहते मन्नतसमोर उभं राहून फोटो काढत असतात. पण या बंगल्यातील एक खोली भाड्याने घ्यायची असेल तर तुम्हाला 30 वर्ष मेहनत करावी लागेल.
शाहरुख खानचा बंगला हा जगातील सर्वात आलिशान बंगल्याच्या यादीत समाविष्ट आहे. रिपोर्टनुसार,'मन्नत' या बंगल्याची किंमत सुमारे 200 कोटींच्या आसपास आहे. दरम्यान या बंगल्यातील एक खोली चाहत्यांना भाड्याने हवी असेल तर किती पैसे मोजावे लागतील यासंदर्भात शाहरुखने भाष्य केलं आहे.
शाहरुखने चाहत्यांसाठी 'आस्क एसआरके' या सत्राचे आयोजन केलं होतं. या सत्रात चाहत्यांनी शाहरुखला व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यासंबंधित अनेक प्रश्न विचारले. दरम्यान एका चाहत्याने शाहरुखला मन्नतमधील एका खोलीच्या भाड्याबद्दल विचारले. या प्रश्नाला उत्तर देत किंग खानने ट्वीट केलं आहे की;"30 वर्षांची मेहनत लागेल." शाहरुख खानचा 'मन्नत' बंगला अनेकांसाठी एक पर्यटन स्थळ आहे. 'मन्नत' पाहण्यासाठी शाहरुखचे अनेक चाहते लांबून लांबून येत असतात.
शाहरुखचे आगामी सिनेमे
'झिरो' सिनेमात शाहरुख शेवटचा दिसला होता. या सिनेमात शाहरुख सोबत अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ दिसून आल्या होत्या. शाहरुखचा 'पठाण' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थ आनंद यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत. 2023 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच नयनतारा आणि सान्या मल्होत्रासोबतदेखील शाहरुख एक सिनेमा करत आहे. शाहरुखचा 'डंकी' हा सिनेमादेखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. राजकुमार हिरानी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. शाहरुखचा 'जवान' सिनेमादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
संबंधित बातम्या