Sarsenapati Hambirrao : प्रविण तरडेंचा (Pravin Tarde) 'सरसेनापती हंबीरराव' (Sarsenapati Hambirrao) हा सिनेमा सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने बॉलिवूडच्या अनेक बिग बजेट सिनेमांना टक्कर दिली आहे. आता या सिनेमाने चौथ्या आठवड्यात दिमाखात प्रवेश केला आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅठफॉर्मवर प्रदर्शित होणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
'सरसेनापती हंबीरराव' या सिनेमाने रिलीजच्या चौथ्या आठवड्यातदेखील हाऊसफुल्ल होतो आहे. त्यामुळेच या सिनेमाने चौथ्या आठवड्यात दिमाखात प्रवेश केला आहे. प्रविण तरडेंनी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. प्रविण तरडेंनी लिहिले आहे, सरसेनापतींचा हाऊसफुल्ल चौथ्या आठवड्यात दिमाखात प्रवेश...मराठीची शान मराठीचा अभिमान".
सिनेमागृहांबाहेर झळकतोय हाऊसफुल्लचा बोर्ड
मुंबई, ठाणे, पुणे, मराठवाडा, विदर्भ, सांगली, नाशिक, कोल्हापूरमध्ये सिनेमागृहात हाऊसफुल्लचे बोर्ड झळकत आहेत. 'सरसेनापती हंबीरराव' या सिनेमात गश्मीर महाजनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. तर प्रविण तरडे स्वतः ‘सरसेनापती हंबीररावां’ची भूमिका साकारत आहेत. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत होते. आता सिनेमा प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अनेक सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड झळकत आहे.
'सरसेनापती हंबीरराव' या सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. त्यामुळे आता सिनेमा प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षक सहकुटुंब सहपरिवार हा सिनेमा पाहत आहेत. ‘महाराजांचं स्वराज्य अठरा पगड जातीजमातींनी मिळून उभं केलं.. हिंदवी स्वराज्यासाठी जो मरणासमोर हटून उभा राहिला तो मरहट्टा.. वीर मराठा..’ अशी गर्जना ऐकून आली आणि प्रेक्षकांमध्ये ‘सरसेनापती हंबीरराव’ या ऐतिहासिक चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली. 'परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट' असे डायलॉग या सिनेमात आहेत.
संबंधित बातम्या