एक्स्प्लोर
अँग्रियर दॅन एव्हर ! ‘सरकार 3’चा फर्स्ट लूक रिलीज
मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘सरकार 3’ सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरुन पोस्टर ट्वीट केला. "Amitabh Bachchan Is Back Angrier Than Ever SARKAR 3 First Look", असं कॅप्शन लिहून राम गोपाल वर्मा यांनी पोस्टर ट्वीट केला आहे.
2005 साली राम गोपाल वर्माचा ‘सरकार’ सिनेमा प्रसिद्ध झाला होता. यामधील महानायक अमिताभ बच्चन यांनी साकारलेली सुभाष नागरेची भूमिका बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तीमत्वाशी मिळती-जुळती होती. त्यानंतर 2008 साली ‘सरकार राज’ प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याही होती. तर आताच्या म्हणजे तिसऱ्या भागात अमिताभ बच्चन पुन्हा एकदा आधीच्या रुबाबात दिसतील.
महानायक अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेला ‘सरकार 3’ सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक असतील, यात शंका नाही.
https://twitter.com/RGVzoomin/status/836197273826557953
‘सरकार 3’ सिनेमा 7 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘Angrier Than Ever’ अशी सरकारच्या फर्स्ट लूकवर अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेसाठी टॅगलाईन वापरण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
क्रीडा
Advertisement