Sardar Udham Out From Oscar Race : बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल (Vicky Kaushal) त्याच्या सरदार उधम (Sardar Udham) सिनेमामुळे सध्या चर्चेत आहे. या सिनेमाचा प्रीमिअर नुकताच अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित करण्यात आला होता. 'मंडेला', 'नयत', 'शेरनी' सारख्या बड्या चित्रपटांसोबत 'सरदार उधम'देखील ऑस्करच्या शर्यतीत होता. पण हा सिनेमा आता ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. चित्रपटाचे परिक्षण करणाऱ्या टीमने मल्याळम 'कूळांगल' सिनेमाची निवड केली आहे. 


सरदार उधम ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडल्याने चाहत्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. चित्रपटाचे परिक्षण करणाऱ्या टीममधील इंद्रदीप दासगुप्ता म्हणाले,"सरदार उधम हा एक उत्तम चित्रपट आहे. सिनेमॅट्रोग्राफीदेखील कमाल आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील दर्जेदार सिनेमा आहे. पण सिनेमात जालियनवाला हत्याकांड दाखवण्यात आला आहे. तसेच हा चित्रपट इंग्रजांविरुद्ध भाष्य करणारा आहे".


भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लढणाऱ्या माणसावर आधारित सिनेमा आहे. पण सिनेमात इंग्रज असल्याने ऑस्करसाठी सिनेमा अयोग्य ठरतो आहे. त्यामुळेच या सिनेमाला ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर काढले आहे. तर दुसरीकडे 'कूळंगल' सिनेमा ऑस्करसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणारा ठरतो आहे.





 


'सरदार उधम' हा एक भारतीय स्वातंत्र्य लढ्यात लढणाऱ्या 'उधम सिंह' चा आत्मचरित्रपर सिनेमा आहे. त्यांचे 1919 साली झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडात महत्तवाचे योगदान होते. या सिनेमाचे दिग्दर्शन शूजित सरकारने केले आहे. 


Vicky Kaushal च्या Sardar Udham Singh चित्रपटावर Katrina Kaif झाली फिदा


सरदार उधम सिंह 
सरदार उधम सिंह हा चित्रपट 16 ऑक्टोबर रोजी ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलने प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची निर्मीती शूजीत सरकार यांनी केली आहे. हा चित्रपट सरदार उधम सिंह यांच्या जीवनावर आधारित आहे. सरदार उधम सिंह यांनी इंग्रजांविरोधात लढा दिला होता.  विकी कौशलचा अभिनय आणि चित्रपटाचे कथानक या गोष्टींमुळे हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. 


Oscars 2022 : शेरनी अन् सरदार उधम सिंह भारताकडून ऑस्करसाठी प्रवेशिका म्हणून शॉर्टलिस्ट