India shortlisted Vidya Balan Sherni and Vicky Kaushal Sardar Udham Singh for Oscars: ऑस्कर हा पुरस्कार मनोरंजन क्षेत्रातील महत्वपूर्ण पुरस्कार मानला जातो. ऑस्कर 2022 साठी भारतामध्ये चित्रपटांची निवड प्रक्रिया सुरू केली आहे. बॉलिवूडमधून दोन चित्रपटांची नावं शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत. बॉलिवूडमधून विद्या बालनचा शेरनी आणि विकी कौशलचा सरदार उधम सिंह या चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. हे चित्रपट बरेच चर्चेत होते. यामधील विकी कौशलचा सरदार उधम सिंह हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. शेरनी अन् सरदार उधम सिंह हे दोन बॉलिवूडपट ऑस्करसाठी प्रवेशिका म्हणून शॉर्टलिस्ट करण्यात आले आहेत.  आता अनेक जण हे पाहायला उत्सुक आहेत की, या दोन चित्रपटांमपैकी कोणता चित्रपट ऑस्कर पुरस्कार विजेता ठरेल. जाणून घेऊयात या दोन चित्रपटांमधील खास गोष्टी-


शेरनी 
शेरनी या चित्रपटामध्ये विद्या बालनने प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये विद्या फॉरेस्ट ऑफिसरच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाचे कथानक मानव आणि प्राणी यांच्यावर अधारित आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित झाला होता.   


सरदार उधम सिंह 
सरदार उधम सिंह हा चित्रपट 16 ऑक्टोबर रोजी ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलने प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची निर्मीती शूजीत सरकार यांनी केली आहे. हा चित्रपट सरदार उधम सिंह यांच्या जीवनावर आधारित आहे. सरदार उधम सिंह यांनी इंग्रजांविरोधात लढा दिला होता.  विकी कौशलचा अभिनय आणि चित्रपटाचे कथानक या गोष्टींमुळे हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. 


स्टार किड असण्याचा फायदा होतो? अभिनेते संजय कपूर यांची मुलगी शनाया म्हणते...


शेरनी आणि सरदार उधम सिंग या चित्रपटांमधील कोणता चित्रपट ऑस्कर पुरस्कारावर आपलं नाव कोरेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 


Prabhas Birthday Celebration : साउथचा स्टार Prabhas चा वाढदिवसानिमित्त चाहत्यांना सिनेमागृहात पुन्हा एकदा पाहता येणार 'मिर्ची' सिनेमा 


Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घरात रंगतोय 'चल रे भोपळ्या टुणूक टुणूक' कॅप्टनसी टास्क, स्पर्धक आखत आहेत रणनीती