Sara Ali Khan Kedarnath Video : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. आपले सिनेमे आणि अभिनयाच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. व्यावसायिकसह वैयक्तिक आयुष्यातील सर्व अपडेट्स ती सोशल मीडियावर शेअर करत असते. साराला फिरण्याची प्रचंड आवड आहे. त्यामुळे भटकंती करतानाचे फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. सारा अली खान आता केदारनाथ (Kedarnath) यात्रेला पोहोचली आहे. 


सारा अली खानने दाखवली केदारनाथ यात्रेची झलक (Sara Ali Khan Shared Kedarnath Video)


सारा अली खानने सोशल मीडियावर केदारनाथ यात्रेचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सारा अली खान लोकल ठिकाणी जेवण करताना दिसत आहे. दरम्यान तेथील एका साधुंचे ती आशीर्वाद घेत आहे. तसेच एका नदीकिनारी ती चेहऱ्यावर पाणी मारताना पाहायला मिळत आहे. त्यावेळी ती म्हणत आहे,"सकाळी-सकाळी थंड पाणी चेहऱ्यावर मारा बुद्धी तेज होईल". एकंदरीतच सारा अली खानचा केदारनाथ यात्रेचा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. साराने या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला 'केदारनाथ' सिनेमातील काफीराना गाणं लावलं आहे.






सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत चाहते


सारा अली खानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. केदारनाथ यात्रेदरम्यानचे साराचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांना मात्र सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) आठवण आली आहे. 


सारा अली खानने शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहते,"ईस्ट असो वा वेस्ट सारा अली खान बेस्ट आहे, व्हा दीदी सुशांत सिंह राजपूतची आठवण आली, काफीराना गाणं ऐकल्यानंतर सुशांतची आठवण आली नाही असं होत नाही, हर हर महादेव, अशा कमेंट्स करत आहेत. 


सारा अली खानच्या आगामी प्रोजेक्टबद्दल जाणून घ्या... (Sara Ali Khan Upcoming Movies)


सारा अली खानने आजवर अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे. 'मेट्रो इन दिनो' हा तिचा आगामी सिनेमा आहे. अनुराग बसू या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. तसेच 'ए वतन मेरे वतन' या सिनेमातही ती झळकणार आहे. या सिनेमात ती स्वातंत्र्यसैनिक ऊषा मेहता यांच्या भूमिकेत झळकणार आहे. अभिनेत्रीच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.


संबंधित बातम्या


November Movie Release : सलमानचा 'Tiger 3' ते राज कुंद्राचा 'यूटी 69'; नोव्हेंबरमध्ये होणार एंटरटेनमेंटचा धमाका