एक्स्प्लोर

मराठीतील पहिला वेब सिनेमा 'संतुर्की'चा ट्रेलर प्रदर्शित

साधी आणि सर्वांना आपलीशी वाटावी अशी कहाणी असलेली 'गावाकडच्या गोष्टी' या वेबसीरिजचे दोन यशस्वी पर्व झाले. गावा-शहरांपासून अगदी सातासमुद्रापार या वेबसिरीजची हवा झाली. सातारा जिल्ह्यातील केळेवाडी गावात जन्मलेल्या वेब सीरिजला जगभरातून प्रेम मिळालं.

मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली सुप्रसिद्ध मराठी वेबसीरिज 'गावाकडच्या गोष्टी'ने एक नवं वळण घेतलं आहे. वेबसीरिजचे दोन पर्व जरी संपले असले तरी हा पूर्णविराम नाही. कोरी पाटी प्रोडक्शनच्या गावाकडच्या गोष्टीमधील लोकप्रिय जोडी "संत्या-सुरकी" यांची प्रेमकथा आपल्याला नितीन पवार दिग्दर्शित "संतुर्की" या वेब सिनेमाद्वारे पाहता येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर आता रिलीज झाला आहे.

मराठी मनोरंजन जगातील हा पहिला प्रयोग असून व्हॅलेंटाईन डेचं औचित्य साधून दर्शकांसाठी आपला पहिला टीजर प्रदर्शित केला होता. टीजरला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळाल्यानंतर सर्वत्र 'संतुर्की'ची चर्चा रंगली होती. संतुर्की या वेब सिनेमाचा ट्रेलर कोरी पाटी प्रोडक्शन्स या यूट्युब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

साधी आणि सर्वांना आपलीशी वाटावी अशी कहाणी असलेली 'गावाकडच्या गोष्टी' या वेबसीरिजचे दोन यशस्वी पर्व झाले. गावा-शहरांपासून अगदी सातासमुद्रापार या वेबसिरीजची हवा झाली. सातारा जिल्ह्यातील केळेवाडी गावात जन्मलेल्या वेब सीरिजला जगभरातून प्रेम मिळालं. यामधील "संत्या आणि सुरकी" हे पात्र सर्वाधिक लोकप्रिय झालं. दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम असूनही काही कारणास्तव त्याचं लग्न होऊ शकल नाही.

लग्न झालेली सुरकी पुन्हा संतोष समोर येते तेव्हा त्याची होणारी तगमग किंवा तिच्या मुलाने मामा म्हटल्यावर होणारी गंमत सगळ्यांना भावली. पण यासोबत सगळ्यांना वेध लागले की इतकं जीवापाड प्रेम करणारी ही दोघं एकमेकांपासून वेगळे का झाले? याचं उत्तर या कोरी पाटी प्रोडक्शनच्या 'संतुर्की' सिनेमात आहे.

'संतुर्की' वेब सिनेमामध्ये संतोष राजे महाडिक, रश्मी साळवी हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत, तर के.टी.पवार, तृप्ती शेडगे, शुभम काळोलीकर, समाधान पिंपळें हे कलाकार देखील सिनेमात असणार आहे. सिनेमाचे लेखन व दिग्दर्शन नितीन पवार यांनी केलं आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

वाढदिवशीच आलिया भट्टने चाहत्यांना दिली गुड न्यूज; म्हणाली, 'बाळ झालं..'; पोस्ट तुफान व्हायरल
वाढदिवशीच आलिया भट्टने चाहत्यांना दिली गुड न्यूज; म्हणाली, 'बाळ झालं..'; पोस्ट तुफान व्हायरल
'मला पहिली बिअर वडिलांनीच पाजली'; ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीनं सांगितला 'तो' किस्सा, म्हणाली मोकळीक दिली
'मला पहिली बिअर वडिलांनीच पाजली'; ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीनं सांगितला 'तो' किस्सा, म्हणाली मोकळीक दिली
'भूत बंगला नाही चालला तर गुडबाय...' प्रसिद्ध दिग्दर्शकाचा सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय? नेमकं काय म्हणाले?
'भूत बंगला नाही चालला तर गुडबाय...' प्रसिद्ध दिग्दर्शकाचा सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय? नेमकं काय म्हणाले?
इराण-अमेरिका युद्धाबाबत नवाजुद्दीन सिद्दीकी रोखठोक बोलला, म्हणाला, 'सगळ्यांना माहितीये चूक कोणाची फक्त कोणीही बोलायची हिंमत दाखवत नाही'
इराण-अमेरिका युद्धाबाबत नवाजुद्दीन सिद्दीकी रोखठोक बोलला, म्हणाला, 'सगळ्यांना माहितीये चूक कोणाची फक्त कोणीही बोलायची हिंमत दाखवत नाही'

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
PAK vs BAN: रोमांचक लढतीत बांगलादेशचा पाकिस्तान विजय, सलमान आगाचं शतक वाया, पाकनं मालिका गमावली 
पाकिस्तानवर मोठी नामुष्की, बांगलादेशचा तिसऱ्या वनडे सामन्यात विजय, मालिका 2-1 नं जिंकली
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय; परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा पराभव
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
Embed widget