Kangana Ranaut Maharashtra Sadan Visit : अभिनेत्री (Actress) आणि नवनिर्वाचित खासदार कंगना रणौत (Kangana Ranaut) हिने महाराष्ट्र सदनातील (Maharashtra Sadan, New Delhi) मुख्यमंत्री कक्षाची (CM Suite) मागणी केली. यानंतर आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे (Shiv Sena Uddhav Thackeray Camp) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कंगना रणौतवर टीका केली आहे. कंगना रणौत हिमाचल प्रदेशमधून निवडून आली असल्याने तिच्या राहण्याची सोय हिमाचल भवनमध्ये करण्यात यावी, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. 


महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्री सुईट मिळावा, कंगनाची मागणी


संजय राऊत यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत कंगना रणौतवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी एक्स मिडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ''बापरे! श्रीमतीजी हिमाचल प्रदेशातून निवडून आल्या आहेत. त्यांच्या निवासाची व्यवस्था हिमाचल भवन येथे व्हायला हवी. हिमाचल भवन येथे मुख्यमंत्री महोदयांचा खास कक्ष श्रीमतीजीना मिळत असेल तर काहीच हरकत नाही. महाराष्ट्राचे खासदार त्यांच्या हक्काच्या सदनात सिंगल खोलीत रहात आहेत श्रीमतीजी.''


संजय राऊतांचं कंगना रणौतवर टीकास्त्र






महाराष्ट्र सदनातील CM कक्ष मिळण्यासाठी कंगनाची धडपड


संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Union Budget 2024) सुरुवात झाली असून सर्व नवनिर्वाचित खासदार दिल्लीत (MP's in Delhi) दाखल झाले आहे. हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) मंडी लोकसभा मतदारसंघातून (Mandi Lok Sabha Constituency) निवडून आलेली अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत ही देखील दिल्लीत पोहोचली आहे. दरम्यान, कंगणा रणौतने महाराष्ट्र सदनात राहणार असल्याची माहिती समोर आली होता.


मुख्यमंत्री कक्ष मिळण्यासाठी कंगनाचा बड्या नेत्याला फोन


अभिनेत्री खासदार कंगना राणौतने महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांचा सूट मागितला होता. इतर रूम छोट्या असल्याने थेट तिने थेट CM सुटची मागणी केली. महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्री कक्ष मिळण्यासाठी कंगनाने मुंबईतील बड्या नेत्याला फोन सुद्धा केल्याची सुत्रांची माहिती आहे. मात्र, प्रोटोकॉलनुसार, खासदार कंगना रणौतला मुख्यमंत्री कक्ष नाकारण्यात आल्याचं समोर आलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Kangana Ranaut : मुख्यमंत्र्यांच्या सूटमध्ये 'क्वीन'; हिमाचलमधून जिंकलेली कंगना महाराष्ट्र सदनात राहणार?