Kangana Ranaut Maharashtra Sadan Visit : देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून 18 व्या लोकसभेचं हे अधिवेशन आहे. त्यानिमित्ताने सर्व नवनिर्वाचित खासदार हे सध्या दिल्लीत दाखल झाले आहेत. हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेली अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) ही देखील त्यानिमित्ताने दिल्लीत दाखल झाली. विशेष म्हणजे यावेळी तिने महाराष्ट्र सदनाला (Maharashtra Sadan) पसंती दर्शवली आहे. खासदारकीची शपथ घेतल्यानंतर कंगना महाराष्ट्र सदनात दाखल झाली आहे. 


पण यावेळी तिने राहण्यासाठी थेट मुख्यमंत्र्‍यांच्याच सुटची मागणी केली. शासकीय निवासस्थान मिळेपर्यंत कंगना रणौत ही महाराष्ट्र सदनात राहणार असल्याची माहिती समोर आली होती. त्याचप्रमाणे ती दिल्लीतील वास्तव्यासाठी महाराष्ट्र सदनातील खोलीची चाचपणी करणार असल्याचंही सूत्रांनी माहिती दिली. मुख्यमंत्र्‍यांच्या सुटसाठी कंगनाने महाराष्ट्रातही फोनाफोनी केली. पण नियमांनुसार तिला हा सुट मिळाला नाही. 


कंगनाला का मिळाला नाही मुख्यमंत्र्‍यांचा सुट?


सध्या दिल्लीत नवनिर्वाचित खासदारांना अद्याप अधिकृत निवासस्थान मिळालेले नाही, त्यामुळे खासदार आपली व्यवस्था शोधत आहेत. त्याचसाठी कंगनाने महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्‍यांचा सूटच कंगनाने मागितला. पण नियमानुसार हा सुट दुसऱ्या कोणाला देता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र सदनाकडून मुख्यमंत्र्‍यांचा सुट मिळणार नाही, असं स्पष्टीकरण देण्यात आलं. त्यासाठी कंगनाने महाराष्ट्रातील बड्या नेत्यांनाही तिने फोन केला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलीये. त्यामुळे आता कंगना तिचं महाराष्ट्र सदनात राहण्याचा निर्णय बदलणार असल्याचंही सांगितलं जातंय. 


महाराष्ट्र सदनाविषयी कंगना काय म्हणाली?


दरम्यान महाराष्ट्र सदनाची कंगनाने पाहणी केली. त्यावेळी तिने महाराष्ट्र सदनाविषयी बोलताना म्हटलं की, 'महाराष्ट्र सदन सगळ्यात सुंदर आहे. महाराष्ट्र हे माझं घर आहे, त्यामुळे इथे मी सदनात आहे. मला इथे येऊन खूप भारी वाटतंय.' पण राहण्यासाठी जेव्हा कंगनाने महाराष्ट्राची सदनाची चाचपणी केली त्यावेळी तिला एकही रुम पसंत पडली नसल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे तिने तिथे राहण्याचा बेत बदलला.                                                                          



ही बातमी वाचा : 


Gharat Ganpati : तुमच्या आमच्या घरातली गोष्ट, 'घरत गणपती' सिनेमाचा ट्रेलर लॉन्च; अजिंक्य देव यांनी केलं दिग्दर्शकाचं कौतुक