Sanjay Leela Bhansali :  बॉलिवूडचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांची 'हिरामंडी' (Heeramandi) वेब सीरिज सध्या चर्चेत आहे. या वेब सीरिजमधील अनेक दृष्ये, वेब सीरिजमधील भव्यता आदींची जोरदार चर्चा होत आहे. या वेब सीरिजसोबतच संजय लीला भन्साळी यांचीदेखील चर्चा सुरू आहे. 'हिरामंडी'च्या माध्यमातून भन्साळी यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले आहे. अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, संजय लीला भन्साळी यांना हे मान्य नाही.  भन्साळी यांनी दिलेल्या एका मुलाखतीत अनेक मुद्यांवर भाष्य केले. आपल्या चित्रपटांमध्ये एकाच अभिनेत्रीला पुन्हा संधी का देत नाही याबाबतही त्यांनी भाष्य केले. 


संजय लीला भन्साळी यांनी गलट्टा प्लसला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, मी खूपच चांगल्या कलाकारांसोबत काम केले आहे. रणबीर, रणवीर, दीपिका, माधुरी दीक्षित, अमिताभ बच्चन  अशा अनेक कलाकारांसोबत काम केले आहे. हृतिक रोशन, प्रियंका चोप्रा, नाना पाटकेर हे माझ्या आवडत्या कलाकारांपैकी एक आहेत. आता हिरांमडीमध्ये सोनाक्षी सिन्हा आणि ऋचा चढ्ढा यांनीही चांगले काम केले आहे.  या  कलाकारांसोबत माझे सूर जुळतात असे मला वाटते. मी आधीच्या चित्रपटातील कलाकारांना पुन्हा पुढील चित्रपटात घेत नसल्याने त्यांना अनेक प्रश्न पडत असतील. आम्ही संजयच्या मागील चित्रपटासाठी इतकं काही केलं तरी आम्हाला संधी का नाही? असा विचार त्यांच्या मनात येणे स्वाभाविक आहे.  


कलाकारांना पुन्हा संधी का नाही?


संजय लीला भन्साळी यांनी सांगितले की,  चित्रपटात कलाकारांची निवड ही ऑर्गेनिक पद्धतीने होते. आम्ही इथे संबंध तयार करायला आलो नाही. मी तुमचा (कलाकारांचा) खूप आदर करतो. माझ्यासाठी जी मेहनत घेतली, त्यासाठी मी प्रेम करतो. आपला वेळ आणि मेहनत देऊन रुपेरी पडद्यावर जादू केली यासाठी मी खूपच आभारी असल्याचे भन्साळी यांनी म्हटले. 
 
भन्साळी यांनी पुढे म्हटले की,  परफॉर्मेन्सबाबत बोलायचे झाले तर माझ्या चित्रपटात काम केलेल्या 90  टक्के कलाकारांनी पडद्यावर जादू निर्माण केली आहे. त्यांच्या प्रेम आणि आदरामुळेच हे शक्य झाले आहे.  या कलाकारांनी नेहमीच आपला चांगला परफॉर्मेन्स सादर करण्याचा प्रयत्न करतात.


आलिया भट्टला करायचे आहेत चार चित्रपट


आलिया भट्टने अलीकडेच एका चॅट शोदरम्यान भन्साळींसोबत पुन्हा-पुन्हा काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आलिया म्हणाली होती की भन्साळी यांनी दीपिकासोबत 3 चित्रपट केले आहेत. आता, त्यांना माझ्यासोबत किमान चार चित्रपट करावे लागतील.


आलियाने संजय लीला भन्साळी  यांच्या'गंगूबाई काठियावाडी'मध्ये काम केले आहे. त्यानंतर आता संजय लीला भन्साळी हे आलिया, रणबीर आणि विकी कौशलसोबत 'लव्ह अँड वॉर' करणार आहे. संजय लीला भन्साळी यांनी दीपिका पदुकोणसोबत 'गोलियों की रासलीला राम-लीला', 'बाजीराव मस्तानी' आणि 'पद्मावत'मध्ये काम केले आहे.