Alia Bhatt Gangubai Kathiawadi Movie : आलिया भट्टच्या (Aalia Bhatt) 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच हा सिनेमा चर्चेत आहे. आता संजय लीला भन्साळी यांच्या बहुप्रतिक्षित 'गंगूबाई काठियावाडी' या सिनेमाचा प्रीमिअर 72 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणार आहे. 


'गंगूबाई काठियावाडी' हा सिनेमा आता 72 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा एक भाग असणार आहे. निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांच्या बॉलिवूडमधील करिअरला पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळेच 'गंगुबाई काठियावाडी' हा त्यांचा 10 वा सिनेमा त्यांच्यासाठी खास ठरला आहे. 


संजय लीला भन्साळी म्हणाले,"गंगुबाई काठियावाडी' सिनेमाची कथा माझ्या खूप जवळची आहे. प्रतिष्ठित बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमच्या सिनेमाचा प्रीमिअर होणार असल्याचा आनंद आहे".





संजय लीला भन्साळी प्रोडक्शन हाउसचा 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमा आता 18 फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करत प्रेक्षकांना अधिकृत माहिती दिली होती.


संबंधित बातम्या


Gangubai Kathiawadi Release Date : Alia Bhatt चा' गंगूबाई काठियावाडी' आता 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला


आलिया भट्टने केले नियमांचं उल्लंघन, क्वारंटाईन बंधनकारक असतानाही पोहोचली दिल्लीला


Brahmastra Motion Poster Launch : अखेर प्रतीक्षा संपली, रणबीर - आलियाच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha