मुंबई : करण जोहरने आयोजित केलेल्या पार्टीत आलिया भट्टदेखील सहभागी झाली होती. याच पार्टीतील करिना आणि करिष्मा कपूरसह चार जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने तिला सात दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला होता. पण 'ब्रह्मास्त्र' सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित होण्यापूर्वी आलियाने दिल्लीतील गुरुद्वाराला भेट दिली आहे. 


आलिया भट्ट हाय रिस्क रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने तिला सात दिवस होम क्वारंटाईन रहाण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर पाच दिवसांतच आलिया दिल्लीत पोहोचली आहे. आलियाने एका दिवसाच्या कामाकरता होम क्वारंटाईनच्या नियमांचं उल्लंघन केले आहे. दरम्यान आपण एका दिवसाच्या कामाकरता दिल्लीला जात असून आपला कोविड रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे आलियाने पालिकेला कळवले आहे.  


बॉलिवूडमध्ये सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान संजय कपूरची पत्नी महीप कपूर आणि सोहेल खानची पत्नी सीमा खानलादेखील कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर सलमान खानचा भाऊ अभिनेता सोहेल खानचा मुलगा योहान खानलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. तसेच अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूरनंतर आता त्यांची मुलगी शनाया कपूरलादेखील (Sonam Kapoor) कोरोनाची लागण झाली आहे. शनायाने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले आहे. 


आलियाचा 'ब्रह्मास्त्र' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
ब्रह्मास्त्र हा सिनेमा 9 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित होऊ शकतो. 'ब्रह्मास्त्र' हा पौराणिक कथानकावर आधारित चित्रपट आहे, असं म्हटलं जात आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या चित्रपटामध्ये या दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 


संबंधित बातम्या


बॉलिवूडकर सूपर स्प्रेडर, अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूरलादेखील कोरोनाची लागण


Brahmastra Motion Poster Launch : अखेर प्रतीक्षा संपली, रणबीर - आलियाच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित