Alia Bhatt Gandubai Kathiawadi Movie Release Date : आलिया भट्टच्या (Aalia Bhatt) 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच हा सिनेमा चर्चेत आहे.  सिनेमागृह सुरू करण्याचे राज्य सरकारने जाहीर करताच आलिया भट्टच्या या बहुप्रतिक्षित सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख निर्मात्यांनी जाहीर केली होती. हा सिनेमा येत्या 6 जानेवारीला प्रदर्शित होणार होता. पण आता या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आलियाच्या चाहत्यांना आता सिनेमाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. संजय लीला भन्साळी प्रोडक्शन हाउसचा गंगूबाई काठियावाडी सिनेमा आता 18 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करत प्रेक्षकांना अधिकृत माहिती दिली आहे. 


'गंगूबाई काठियावाडी' सिनेमा 6 जानेवारीला प्रदर्शित होणार होता. दरम्यान 'आरआरआर' सिनेमाच्या निर्मात्यांनी 'आरआरआर' सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख 7 जानेवारी असल्याचे जाहीर केले. दोन बडे सिनेमे एकत्र प्रदर्शित होणे सिनेमाच्या दृष्टीने योग्य नसल्याने 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.  एसएस राजामौलीचा 'आरआरआर' सिनेमा बिग बजेट सिनेमा आहे. या सिनेमात ज्यूनिअर एनटीआर (Jr.NTR), राम चरण (Ram Charan), अजय देवगन (Ajay Devgn) आणि आलिया भट्ट दिसून येणार आहेत.





'आरआरआर' सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून बाहुबली सिनेमासोबत या सिनेमाची तुलना केली जात आहे. एसएस राजामौलीने अतीशय भव्यदिव्य पद्धतीने सिनेमाची निर्मिती केली आहे. तर दुसरीकडे संजय लीला भन्साळीच्या 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमात आलियाचा अनोखा अंदाज पाहायला मिळणार आहे. या सिनेमासाठी आलियाने प्रचंड मेहनत घेतली होती. 


संबंधित बातम्या


'हिंदुस्थान का शेर आ रहा है'; पृथ्वीराजचा टीझर प्रदर्शित, अक्षय कुमारचा रॉयल लूक चर्चेत


आता अजय देवगणच्या 'सिंघम 3' ची प्रतिक्षा, Rohit Shetty पुढच्या वर्षी चित्रिकरणाला सुरुवात करणार


Dhamaka: Kartik Aaryan चा 'धमाका', 'या' तारखेला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha