एक्स्प्लोर
संजय दत्तच्या ‘भूमी’च्या पोस्टरचं डिझाईन ‘द ग्रे’ची कॉपी?
अभिनेता संजय दत्तच्या आगामी भूमी सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं आणि लगेचच त्यावर टीकाही सुरु झाली. या टीकेमागचं कारण होतं या पोस्टरचं डिझाईन. भूमी सिनेमाचं हे पोस्टर 'द ग्रे' या हॉलिवूडपटाच्या पोस्टरची कॉपी असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगू लागली आहे.
मुंबई : अभिनेता संजय दत्तच्या आगामी भूमी सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं आणि लगेचच त्यावर टीकाही सुरु झाली. या टीकेमागचं कारण होतं या पोस्टरचं डिझाईन. भूमी सिनेमाचं हे पोस्टर 'द ग्रे' या हॉलिवूडपटाच्या पोस्टरची कॉपी असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगू लागली आहे.
‘भूमी’च्या पोस्टरच्या वादानंतर सिनेदिग्दर्शक अभिनव सिन्हा मात्र संजय दत्तच्या बाजूने उभा राहिला आहे. क्लोज अपची थीम अनेक सिनेमांनी वापरली असून त्यावर कोणीच हक्क सांगू शकत नाही, असं अभिनव सिन्हाने म्हटलं आहे.
उमंग कुमार दिग्दर्शित ‘भूमी’ सिनेमाची निर्मिती भूषण कुमार आणि संदीप सिंह यांनी केली आहे.
येरवडा जेलमधून बाहेर आल्यानंतर संजय दत्त आगामी ‘भूमी’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत असून, भावनाप्रधान आणि संवेदनशील आशयाचा हा सिनेमा असेल. बाप-लेकीच्या नात्यावर आधारित सिनेमाची कथा असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूरआणि आदिती राव हैदरी यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
येत्या 22 सप्टेंबरला ‘भूमी’ सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. मोठ्या कालावधीनंतर संजय दत्त पुनरागमन करत असल्याने सिनेमाची उत्सुकता वाढली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement