मुंबई : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने 28 दिवसांनंतर यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. अभिषेक बच्चनने स्वत: ही माहिती ट्विटरवर दिली आहे. अभिषेक बच्चन आज कोरोनामुक्त झाला आहे, अशारीतीने संपूर्ण बच्चन कुटुंब आज कोरोनामुक्त झालं आहे.


अभिषेक बच्चनने ट्विटरवर लिहिलं की, वचन म्हणजे वचन असतं! आज दुपारी माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. मी तुम्हाला सांगितलं होतं यावर मत करेन. मी आणि माझ्या कुटुंबासाठी प्रार्थना केल्याबद्दल सर्वांचे आभार. नानावटी हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफने जे केले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. धन्यवाद





28 दिवसांनंतर कोरोना चाचणी निगेटिव्ह


अभिषेक बच्चन 11 जुलै रोजी संध्याकाळी नानावटी रुग्णालयात दाखल झाले होते. तेव्हापासून आजपर्यंत 28 दिवस अभिषेक बच्चनने रुग्णालयात काढले. अखेर आज अभिषेकला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. अभिषेक बच्चनकडून सोशल मीडियावर या 28 दिवसांमध्ये सातत्याने बच्चन कुटुंबियांचे हेल्थ अपडेट्स मिळत होते. याआधी महानायक अमिताभ बच्चन 2 ऑगस्ट रोजी कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.


अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचे कोविड रिपोर्ट 11 जुलै रोजी पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर 17 जुलै रोजी ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांनाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ऐश्वर्या आणि आराध्या यांना 27 जुलै रोजीच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.


संबंधित बातम्या