Sangeeth Sivan Dies : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संगीत सिवन यांचे निधन (Sangeeth Sivan Dies ) झाले आहे. बुधवारी, 8 मे रोजी सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 65 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने चाहते आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंत प्रवास करत अनेक चांगल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. त्यांच्या निधनाने रितेश देशमुख (Riteish Deshmukh), सनी देओल (Sunny Deol) यांच्यासह अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.
संगीत सिवन यांनी क्या कूल है हम, अपना सपना मनी मनी, यमला पगला दिवाना यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. संगीत सिवान यांचा भाऊ संतोष सिवान हे देखील सिनेसृष्टीतील महत्त्वाचे दिग्दर्शक आहेत. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत संगीत यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले.
रितेश देशमुखवर कोसळला दु:खाचा डोंगर
संगीत सिवनच्या निधनावर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडियावर पोस्ट लिहित आपला शोक व्यक्त केला आहे. संगीत सिवन यांच्या निधनाच्या वृ्त्ताने आपण प्रचंड दु:खी झालो असल्याचे रितेशने म्हटले.
रितेशने म्हटले की, एक नवोदित अभिनेता म्हणून आपल्यावर विश्वास ठेवावा आणि काम करण्याची संधी मिळावी, अशी प्रत्येक नवोदित कलाकाराची इच्छा असते. 'क्या कूल हैं हम' आणि 'अपना सपना मनी मनी'चे दिवस मला अजूनही आठवतात. उत्तम माणूस, मृदू स्वर आणि उत्तम व्यक्तिमत्व म्हणजे संगीत सिवान. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने मला हादरवून सोडले आहे.' रितेश देशमुखसह सोशल मीडियावर चाहत्यांनीही दुःख व्यक्त केले आहे.
सनी देओलकडून शोक व्यक्त
अभिनेता सनी देओलने देखील संगीत सिवानच्या निधनावर शोक व्यक्त केला. सनी देओलने म्हटले की, “माझ्या प्रिय मित्राच्या निधनाची बातमी ऐकून विश्वास बसत नाही. माझा विश्वास बसत नाही की संगीत आता आमच्यासोबत नाहीस. पण तू नेहमी आमच्या हृदयात आणि आठवणींमध्ये राहशील असे संगीत सिवानने म्हटले.
कोण होते संगीत सिवान
संगीत सिवन हे दक्षिणेतील चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक होते. मल्याळम इंडस्ट्रीत आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या संगीत सिवान यांनी बॉलिवूडलाही हिट चित्रपट दिले आहेत. व्यूहम या चित्रपटातून संगीत सिवन यांनी सिने कारकिर्दीतील प्रवास सुरू केला. दाक्षिणात्य सिनेसृष्टीसोबतच सिवान यांनी बॉलीवूडमध्येही चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.