Sam Bahadur Badhte Chalo Song Release : अभिनेता विकी कौशलच्या (Vicky Kaushal) सॅम बहादुर (Sam Bahadur) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटात विकी हा फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता सॅम बहादुर या चित्रपटामधील  'बढते चलो' हे गाणं रिलीज झालं आहे. या गाण्याच्या लिरिक्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


गाणं ऐकून आले अंगावर शहारे


'बढते चलो' या गाण्यात विकी कौशल हा सौनिकांना लढाईसाठी तयार करताना दिसत आहे. या गाण्यात सैनिक हे विविध घोषणा देखील देताना दिसत आहे. 'बढते चलो'  या देशभक्तीपर गाण्यामध्ये सैनिक हे  बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय,  बजरंगबली की जय, बिरसा मुंडा की जय, राजा रामचंद्र की जय, बोलो हिंदुस्थान की जय, जो बोले सो निहाल सत श्री अकाल अशा घोषणा देताना दिसत आहेत. हे गाणं ऐकून अंगावर शहारे आले, अशी कमेंट अनेक नेटकऱ्यांनी या गाण्याला केली आहे.


गाण्यामध्ये सॅम माणेकशॉच्या भूमिकेत असणारा विकी कौशल हा आपल्या बटालियनला प्रेरणा देताना दिसत आहे. गाण्याच्या सुरुवातीला ऐकू येतं की विकी सैनिकांना म्हणतो, "आपण या दिवसासाठी तयारी केली आहे. ". 'बढते चलो' हे गाणे देशातील लोकांमधील उत्साह आणि देशभक्तीची भावना वाढवत आहे.


गुलजार यांनी लिहिलंय गाणं


 'बढते चलो' हे गाणे शंकर महादेवन आणि विशाल ददलानी यांनी गायले आहे. या गाण्याला  शंकर एहसान लॉय यांनी संगीत दिले असून  गुलजार यांनी हे गाणं लिहिलं आहे.  या गाण्याचं सोशल मीडियावर अनेकजण कौतुक करत आहेत.






कधी रिलीज होणार सॅम बहादुर?


सॅम बहादुर हा चित्रपट मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 1 डिसेंबर 2023 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात फातिमा सना शेखनं   इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:  


Sam Bahadur Trailer Out: नजर अशी की, दुश्मनाला थरकाप उडेल; सॅम माणेकशॉ यांची कथा मांडणार विकी, पाहा 'सॅम बहादुर'चा जबरदस्त ट्रेलर