Sam Bahadur Trailer Out:  अभिनेता विकी कौशलच्या (Vicky Kaushal) सॅम बहादुर (Sam Bahadur) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमधील विकीच्या लूकनं आणि त्याच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. सॅम बहादुर चित्रपटाच्या ट्रेलरमधील प्रत्येक फ्रेम आणि डायलॉग हे लक्ष वेधतात. सॅम बहादुर या चित्रपटाच्या ट्रेलसा नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. 


विकी कौशलनं सॅम बहादुर या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "तुम्हाला भारताचे महान सैनिक, सॅम माणेकशॉ यांच्या जीवनाची एक झलक सादर करत आहोत."


सॅम बहादुर या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला 'पुरजा-पुरजा कट मरे..पर कबहू न छड्डे खेत..' हा डायलॉग ऐकू येतो. ट्रेलरमध्ये विकी कौशल, फातिमा सना  आणि सान्या मल्होत्रा या कलाकरांची देखील झलक पहायला मिळते. 


पाहा ट्रेलर:






 विकीच्या सॅम बहादुर या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. नीरज काबी, एडवर्ड सोनेनब्लिक, रिचर्ड भक्ती क्लेन, साकिब अयुब आणि कृष्णकांत सिंह बुंदेला या कलाकारांनी देखील या चित्रपट महत्वाची भूमिका साकारली आहे. फातिमा सना शेखनं  सॅम बहादुर  या चित्रपटात इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे तर सान्या मल्होत्रानं  सॅम माणेकशॉ यांच्या पत्नी सिल्लू माणेकशॉ यांची भूमिका साकारली आहे.


मेघना गुलजार यांनी देखील सॅम बहादुर चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. सॅम बहादुर  हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  काही दिवसांपूर्वी सॅम बहादुर या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला. "मुझे पॉलिटिक्स में कोई इंटरेस्ट नहीं है, आर्मी ही मेरी लाईफ है" या टीझरमधील विकीच्या डायलॉगनं अनेकांचे लक्ष वेधले. 


तसेच सॅम बहादुर चित्रपटाचं पोस्टर देखील काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. त्यामध्ये विकी हा एका जिपवर बसलेला दिसत आहे. त्याच्या हातात काठी आणि डोक्यावर टोपी दिसत आहे. विकीनं हा पोस्टर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "SAM IS HERE!!!"


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:  


Sam Bahadur New Poster Out: हातात काठी अन् भेदक नजर; सॅम बहादुर चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज, विकीच्या लूकनं वेधलं लक्ष