Tiger 3: अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) टायगर 3 (Tiger 3) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाचं अनेक जण कौतुक करत आहेत. अशातच  मालेगाव (Malegoan)  येथील थिएटरमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये सलमान खानचे चाहते टायगर-3 या चित्रपटाच्या शोदरम्यान थिएटरमध्ये फटाके फोडताना दिसले. या प्रकरणी थिएटर मालकाने पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. यानंतर छावणी पोलीस ठाण्यात (Malegaon Police) संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर सलमान खाननं एक ट्वीट शेअर करुन प्रतिक्रिया दिली आहे.


सलमान खानचं ट्वीट (Salman Khan Tweet) 


नुकतेच सलमाननं एक ट्वीट शेअर केलं आहे. सलमाननं या ट्वीटच्या माध्यमातून चाहत्यांना थिएटरमध्ये फटाके न उडवण्याची विनंती केली आहे. सलमाननं ट्वीटमध्ये लिहिलं , "मला असं काळलं आहे की, टायगर 3 चित्रपटाच्या शोदरम्यान थिएटरमध्ये फटाके उडवले गेले आहेत. हे धोकादायक आहे. स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात न घालता चित्रपटाचा आनंद लुटूयात. सुरक्षित राहा."  






नेमकं प्रकरण काय?


नाशिकच्या (Nashik) मालेगाव (Malegaon) शहरात सुरु असलेल्या टायगर-3 चित्रपटाच्या शो दरम्यान भरगच्च थिएटरमध्ये फटाके फोडण्यात आले. पडद्यावर सलमान खानची एन्ट्री होताच चाहत्यांनी फटाके उडवण्यास सुरुवात केली. थिएटरमध्ये  धडाधड फटाके फुटू लागले.  हे प्रकरण  थिएटरमध्ये फटाके फोडणाऱ्यांच्या चांगलंच अंगलट आलं. कारण थिएटर मालिकानं या प्रकरणी थेट पोलिसात तक्रार केली.या तक्रारीनुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


टायगर-3 चा बॉक्स ऑफिसवर कल्ला (Tiger 3 Box Office Collection) 


 सलमान खानच्या टायगर-3  या चित्रपटानं ओपनिंग-डेला  44.5 कोटी रुपयांचे कलेक्शन केलं आहे.  टायगर 3 चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे. हा चित्रपट YRF च्या  स्पाय युनिव्हर्सचा एक भाग आहे.   या चित्रपटात सलमान खान,कतरिना कैफ  आणि इमरान हाश्मी यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटत शाहरुख खान आणि हृतिक रोशन यांचा देखील कॅमिओ आहे.






इतर महत्वाच्या बातम्या : 


Nashik News : सलमान खानच्या चाहत्यांची मस्ती उतरवली, थेट मालकानेच केली तक्रार; मालेगावच्या थिएटरमध्ये काय घडलं?