Shahrukh-Salman : जगभरात आज ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. बॉलिवूडचे सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) आणि शाहरुख खान (Shahrukh Khan) यांनीदेखील घराच्या बाल्कनीत येऊन चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. किंग खान- भाईजानचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
किंग खान आणि भाईजानच्या चाहत्यांनी त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या बंगल्याबाहेर प्रचंड गर्दी केली होती. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक होते. सलमान खान चाहत्यांना भेटण्यासाठी 'गॅलेक्सी अपार्टमेंट'च्या बाल्कनीत आला होता. तर शाहरुख आणि सलमान एकाच वेळी चाहत्यांना भेटण्यासाठी बाल्कनीत आले होते. शाहरुख-सलमानने हे फोटो सोशल मीडियावरदेखील शेअर केले आहेत.
'या' सेलिब्रिटींनीदेखील दिल्या ईदच्या शुभेच्छा
सलमान-शाहरुख व्यतिरिक्त अमिताभ बच्च, सलमान-शाहरुख व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, अजय देवगण, संजय दत्त, हुमा कुरेशी, शिल्पा शेट्टी, दिया मिर्झा, आर माधवन आणि रवीना टंडन सारख्या अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
संबंधित बातम्या