File No 498A : 'फाईल नंबर 498 A' (File No 498A) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर लॉंच करण्यात आले आहे. मराठी चित्रपटांमध्ये आत्तापर्यंत न्यायव्यवस्थेशी संबंधित किंवा कोर्टरूम ड्रामा प्रकारातील काही चित्रपट येऊन गेले. त्यात आता मल्हार गणेश दिग्दर्शित 'फाईल नंबर- 498 A' या आगळ्यावेगळ्या नावाच्या चित्रपटाची भर पडत असून, या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं आहे.


सौ.आरती श्रीधर तावरे यांची निर्मिती असलेल्या आणि मनीष हर्षा मुव्हीज प्रस्तुत  'फाईल नंबर - 498 A" या चित्रपटाची कथा श्रीधर शंकर तावरे यांनी लिहिली आहे. तर श्रीधर शंकर तावरे आणि आशिष निनगुरकर यांनी पटकथा लिहिली आहे.  संवाद आणि गीतलेखन  आशिष निनगुरकर यांचं आहे. स्वप्नील प्रफुल्ल यांनी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली असून कायद्यातील 498 A या कलमाअंतर्गत एक तरुण कसा अडकतो याची गोष्ट या चित्रपटात मांडण्यात आली आहे. 


आतापर्यंत काही चित्रपटांमध्ये कोर्टरूम ड्रामा सादर झाला असला, तरी "फाईल नंबर- 498 A" हा चित्रपट अधिक वेगळ्या पद्धतीनं सादर होणार आहे. पोस्टरवर मागणारे हात आणि मंगळसूत्रात बांधलेले हात, पार्श्वभूमीवर उडणारी कबुतरं दिसत असल्यानं स्वातंत्र्य, बंधनं या बाबतची मांडणी चित्रपटात असेल असा अंदाज आपल्याला करता येतो. चित्रपटाचं पोस्टर लक्षवेधी असून,चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाल्याने प्रेक्षक सिनेमाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. या सिनेमाचे नावच आगळेवेगळे असल्याने प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता आहे. या सिनेमात अनेक विषयांवर भाष्य करण्यात येणार आहे. 


संबंधित बातम्या


Akshyaya - Hardik Engaged : अखेर राणा दा अन् अंजली बाईंचं जमलं; अक्षया-हार्दिकने गुपचूप उरकला साखरपुडा


Bhonga : 'भोंगा' सिनेमागृहातून काढायला लावणं पोलिसांच्या कोणत्या अधिकारात बसतं? अमेय खोपकरांचा सवाल


Sachin Kharat : राज्य सरकारने प्राजक्ता माळीवर कायदेशीर कारवाई करावी; सचिन खरातांची मागणी