Katrina Kaif : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) सध्या चांगलीच चर्चेत आहे. बॉलिवूडची 'कॅट' अर्थात कतरिना 2021 मध्ये बॉलिवूड अभिनेता विकी कौशलसोबत (Vicky Kaushal) लग्नबंधनात अडकली होती. विकी आणि कतरिनाच्या लग्नाला दोन वर्ष झाली आहेत. अशातच आता कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. अभिनेत्रीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर अभिनेत्री प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना जोर आला. या फोटोमध्ये कतरिनाच्या एका हातात कॉफीचा मग आणि दुसरा हात तिने पोटावर ठेवलेला दिसून आला होता. फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी अभिनेत्री प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना सुरुवात केली. विकी कौशल प्रेग्नंट कतरिना कैफला भेटायला लंडनला रवाना झाल्याच्याही चर्चा सुरू झाल्या. आता या प्रेग्नंसीच्या बातमीत किती तथ्य आहे जाणून घ्या...
कतरिना कैफच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना पूर्णविराम
बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, विकी कौशलसोबत लग्न केल्यानंतर कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याच्या अफवा अनेकदा समोर आल्या आहेत. चाहत्यांनी आता या अफवांवर विश्वास ठेऊ नये. विकी आणि कतरिनाच्या घोषणेवर चाहत्यांनी फक्त विश्वास ठेवावा. कतरिना कैफ प्रेग्नंट नाही. अद्याप विकी कौशल आणि तिने फॅमिली प्लॅनिंगबद्दल काहीही विचार केलेला नाही. कतरिना कैफ काही वैयक्तिक कामानिमित्त लंडनमध्ये आहे. आपल्या कुटुंबियांसमवेत ती वेळ घालवत आहे. आता विकी कौशलदेखील तिच्या ट्रिपमध्ये सहभागी झाला आहे".
कतरिना कैफने आगामी प्रोजेक्टची घोषणा केलीच नाही
कतरिना कैफ जानेवारी 2024 मध्ये आलेल्या 'मेरी क्रिसमस' या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात अभिनेत्री दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली होती. कतरिनाचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. कतरिनाने अद्याप आपल्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही. कतरिना कैफचे चाहत्यांना आता अभिनेत्रीच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकता आहे.
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह सप्टेंबर महिन्यात आई-बाबा होणार आहेत. दीपिका-रणवीरआधी ऋषा चड्ढा आणि अली अफज यांनी चाहत्यांना प्रेग्नंसीची गुडन्यूज दिली होती. काही दिवसांपूर्वी अनुष्का शर्माने मुलाला जन्म दिला. तसेच बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा लवकरच आई होणार असल्याचं म्हटलं जात आहे. अद्याप अभिनेत्री यासंदर्भात काहीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
कतरिना कैफबद्दल जाणून घ्या... (Who is Katrina Kaif)
कतरिना कैफ बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. हिंदी चित्रपटांसह तेलुगू आणि मल्याळी चित्रपटांमध्ये कतरिनाने काम केलं आहे. कतरिना परदेशात लहानाची मोठी झाली आहे. बुम या चित्रपटाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. कतिरनाचे मैने प्यार क्यू किया, नमस्ते लंडन, मेरे ब्रदर की दुल्हनिया, अजब प्रेम की गजब कहानी, राजनिती, जिंदगी ना मिलेगी दोबारा, एक था टायगर, टायगर जिंदा है, सुर्यवंशी असे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत.
संबंधित बातम्या