Pravin Tarde Movie : गेल्या काही दिवसांत विविष विषयांवर भाष्य करणारे सिनेमे (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 2024 हे वर्ष मराठी मनोरंजनसृष्टीसाठी खूपच खास आहे. वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांचा 'लॉकडाऊन लग्न' (Lockdown Lagna) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


दोन वर्षांपूर्वीचा कोरोना काळ आणि लॉकडाऊन हा  सर्वांच्याच लक्षात आहे. याच लॉकडाऊनमधील एका लग्नाची मजेशीर गोष्ट आता 'लॉकडाऊन लग्न' या आगामी चित्रपटातून मांडण्यात आली आहे. नुकतचं या सिनेमाचं धमाकेदार पोस्टर आऊट झालं आहे.


'लॉकडाऊन लग्न' कधी रिलीज होणार? (Lockdown Lagna Release Date)


'लॉकडाऊन लग्न' या चित्रपटाचं पोस्टर लाँच नुकतेच सोशल मीडियावर करण्यात आलं असून, येत्या 8 मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रवीण तरडे यांचा अभिनय आपल्याला या चित्रपटात पहायला मिळणार असून इतर कलाकरांची नावे अजुन गुलदसत्यात ठेवण्यात आली आहेत. 


मास्क, सँनिटायझर अन् बरचं काही


'लॉकडाऊन लग्न' सिनेमाच्या पोस्टरवर असलेल्या मास्क, सँनिटायझर यावरून चित्रपटातून कोरोना काळातली गोष्ट दाखवली जाणार असल्याचं दिसून येते. आजवर अमोल कागणे यांच्या हलाल, भोंगा, लेथ जोशी या चित्रपटानी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले होते. 'लॉकडाऊन लग्न'ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना या सिनेमाची उत्सुकता आहे. 


प्रवीण तरडे यांचा 'धर्मवीर 2' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी बलोच, सरसेनापती बंबीरराव अशा सुपरहिट सिनेमांत प्रवीण तरडेंच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली आहे. आता प्रवीण तरडेंच्या आगामी सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.






आजवर अनेक विविध विषयांवर तब्बल 18 हुन अधिक चित्रपटांची निर्मिती आणि प्रस्तुती ही अमोल कागणे स्टुडिओ यांनी केली असून त्यानंतर आता ते ही नवी गोष्ट घेऊन येण्यास सज्ज झाले आहेत. अमोल कागणे  प्रस्तुत "लॉकडाऊन लग्न" या चित्रपटाची निर्मिती लक्ष्मण कागणे, अमोल कागणे आणि सागर पाठक यांनी केली आहे. सुमित संघमित्र यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे, तर अमोल गोळे यांनी चित्रपटाचं छायांकन केलं आहे.