Salman Khan Security : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आण माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या भररस्त्यात गोळी मारुन हत्या करण्यात आली आहे. दुर्गापुजेदरम्यान बाबा सिद्दीकी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. भररस्त्यात आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला. ज्यामध्ये ते जखमी झाले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर वातावरण तापलं आहे. आता सलमान खानच्या सुरक्षेतची वाढ करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी आणि सलमान खान यांची घनिष्ट मैत्री होती. यामुळे आता सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
सलमान खानच्या गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर टाईट सिक्युरिटी
बाबा सिद्दीकी यांना 15 दिवस आधी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमध्ये बिश्नोई गँगचा हात असल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. याच बिश्नोई गँगने अभिनेता सलमान खानलाही धमकी दिली होती. याशिवाय सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता.
बिश्नोई गँगची धमकी, घराबाहेर गोळीबार
सलमानच्या वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर एप्रिल महिन्यामध्ये गोळीबार झाला होता. त्यानंतर आता बाबा सिद्दीकींच्या हत्येमध्ये बिश्नोई गँगचं कनेक्शन समोर आल्यामुळे सलमानची सुरक्षा वाढवली आहे. गॅलक्सी अपार्टमेंट तगडा पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. सलमानला घरात थांबण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या
महाराष्ट्राचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची शनिवारी संध्याकाळी तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. ते वांद्रे येथील त्यांच्या मुलाच्या कार्यालयाबाहेर असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यानंतर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. दरम्यान, बाबा सिद्दिकी यांचा मित्र आणि अभिनेता सलमान खानला रुग्णालयात येण्यास मनाई करण्यात आली आहे.
गोळी झाडली तेव्हा बाबा सिद्दीकी कुठे होते?
निर्मल नगर येथील कोलगेट मैदानाजवळील त्यांचा आमदार मुलगा झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'दोन ते तीन गोळ्या झाडण्यात आल्या. पुढील तपास सुरू आहे कारण पथके परिसरात पोहोचली आहेत."
महत्त्वाच्या इतर बातम्या :