Salman Khan Death Threat : महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अजित पवार गटाचे नेते माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचं कनेक्शन बिश्नोई गँगसोबत असल्याचं बोललं जात आहे. 15 दिवसांपूर्वी बाबा सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही त्यांची हत्या झाली. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी आणि सलमान खान चांगले मित्र होते. यामुळे भाईजानची सिक्युरिटी वाढवण्यात आली आहे.
बाबा सिद्दीकींच्या मृत्यूनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सिद्दीकींना रुग्णालयात दाखल केल्यावर सलमान शनिवारी टाईट सिक्युरिटीमध्ये हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता. सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणात तीन जणांचा अटक करण्यात आली असून त्यांचं संबंध बिश्नोई गँगशी असल्याचं पोलिस समोर आलं आहे. दरम्यान, अभिनेता सलमान खानलाही बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. सलमान खानचे वडील सलीम खान यांनाही धमकी देण्यात आली होती. काही महिन्यापूर्वी सलमान खानच्या मुंबईतील घरावर गोळीबारही करण्यात आला होता.
बिग बॉस 18 ची शूटींग थांबवलं
अभिनेता सलमान खानला पोलिसांनी रुग्णालयात येण्यापासून मनाई केली आहे. त्याला घरीच राहण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, सलमान खाननं त्याचं बिग बॉस 18 शोचं शूटिंगही थांबवलं आहे. बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर भाईजान तात्काळ रुग्णालयात पोहोचला होता. त्यानंतर त्याला घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
बाबा सिद्दिकींच्या हत्येचं बिश्नोई कनेक्शन
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी 2 सप्टेंबरपासून कुर्ल्यात भाड्याने खोली घेऊन रहात होते. चार जणांनी मिळून बाबा सिद्धीकी याच्या हत्येची सुपारी घेतली होती. पंजाबमध्ये एका जेलमध्ये असताना हे तिघं जणं एकमेकांच्या संपर्कात आले होते. जेलमध्ये आधीपासून बिष्णोई गॅगचा एक सदस्य होता त्याच्या संपर्कात हे तिघं आले. तीन आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे. फरार आरोपीच्या शोधासाठी गुन्हे शाखेची तीन पथकं मध्यप्रदेश, हरियाणा आणि दिल्ली येथे रवाना झाली असल्याची माहिती सूत्रांची माहिती आहे. अभिनेता सलमान खानच्या घरावर ज्यावेळी हल्ला झाला. त्यावेळी देखील आरोपीचे नियोजन अशाच प्रकारे करण्यात आले होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :