Jigra Movie Box Office Collection : अभिनेत्री आलिया भटचा बहुचर्चित 'जिगरा' चित्रपट थिएटमध्ये दाखल झाला आहे. 11 ऑक्टोबरला रिलीज झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अद्याप काही खास कमाई करता आलेली नाही. प्रेक्षकांनी आलिया भट आणि वेदांग रैना स्टारर या चित्रपटाकडे पाठ फिरवल्याचं दिसत आहे. अनेक ठिकाणी या चित्रपटाचे शो रद्द करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. आता अभिनेत्री आणि दिग्दर्शक दिव्या खोसला कुमार हिने आलिया भटच्या जिगरा चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर करत टीका केली आहे. इतकंच नाही, तर आलिया भटने स्वत:चं चित्रपटाचे तिकीट्स विकत हाऊसफुलचे बोर्ड लावल्याचा आरोपही दिव्यानं केला आहे. 


जिगराच्या फेक बॉक्स ऑफिस कलेक्शनवर दिव्या खोसलाचा संताप


आलिया भट्टचा जिगरा हा चित्रपट रिलीज झाल्यापासूनच चर्चेत आहे. नुकतेच कंगना रणौतने आलिया भट्टला चित्रपटाच्या थंड ओपनिंगबद्दल अप्रत्यक्ष टोला लगावलाआणि आता दिव्या खोसलाने एका पोस्टद्वारे थेट आलिया भटवर निशाणा साधला आहे. दिव्याने जिगरा चित्रटाच्या कलेक्शनचे आकडे बनावट असल्याचं म्हटलं आहे. आलिया आणि दिव्याच्या वादात आता करण जोहरने उडी घेतली आहे. दिव्या खोसला हिने 'जिगरा' चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. 'जिगरा' चित्रपट पाहिल्यानंतर दिव्याने संताप व्यक्त केला आहे.


दिव्या खोसलाची इंस्टाग्राम स्टोरी


दिव्या खोसलाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री दिव्या खोसला 'जिगरा' चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये पोहोचली. यावेळी तिला थिएटर पूर्णपणे रिकामे दिसले. या फोटोमध्ये, दिव्याने आलिया भट्टमध्ये खरोखर जिगरा असल्याचं म्हटलं खोचक टीका केली आहे. याशिवाय चित्रपटाच्या बनावट बॉक्स ऑफिस कलेक्शनवरही दिव्याने नाराजी व्यक्त केली.


'आलिया भट्ट में सचमुच बहुत जिगरा है...'


दिव्या खोसलाने थिएटरमधील एक फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत म्हटलं आहे की, "मी सिटी मॉल पीवीमध्ये जिगरा चित्रपट पाहायला गेली होती. पण थिएटर पूर्ण रिकामे होते. सगळीकडे थिएटर्स रिकामे आहेत. आलिया भटमध्ये खरंच जिगरा आहे. स्वत:चं तिकीटे विकत घेऊन फेक कलेक्शनची घोषणा केली. मला प्रश्न पडलाय की, विकलेली मीडिया यावर काही बोलत का नाही?"



दिव्याच्या पोस्टवर करण जोहरची प्रतिक्रिया


दिव्या खोसलाच्या या पोस्टनंतर, करण जोहरने इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे, जी अभिनेत्री दिव्यासाठी असल्याचं बोललं जात आहे. जिगरा चित्रपटाचा निर्माता करण जोहरने लिहिलंय, "मूर्खाला उत्तर देण्यासाठी मौन हा सर्वोत्तम पर्याय आहे."


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Salman Khan Security : बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ, बिग बॉस 18 ची शूटींग थांबवली; हॉस्पिटलमध्ये जाण्यास मनाई