एक्स्प्लोर
Advertisement
धूम 4 मध्ये सलमान खान खलनायकाच्या भूमिकेत?
मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार आणि नेहमी गुडी-गुडी भूमिकेत दिसणारा सलमान खान खलनायकाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. आगामी 'धूम 4' आणि 'रेस 3' चित्रपटात भाईजान नकारात्मक भूमिकेत दिसणार असल्याची माहिती आहे.
'सलमानला कूल आणि स्टायलिश व्हिलन साकारायचा होता. त्याने अशाप्रकारची व्यक्तिरेखा यापूर्वी कधी केली नव्हती. रेस 3 मध्ये त्याची व्यक्तिरेखा जवळपास निश्चित असून आदित्य चोप्रांसोबत धूम 4 बाबत बोलणी सुरु आहे', अशी माहिती डीएनए वृत्तपत्रात सुत्राच्या हवाल्याने दिली आहे.
धूम सिरीजमध्ये आतापर्यंत जॉन अब्राहम, हृतिक रोशन, आमीर खान यांनी व्हिलन साकारले आहेत. त्यामुळे सलमानलाही व्यक्तिरेखा साकारण्याची इच्छा आहे. यशराज फिल्म्सनी चित्रपटाचा दिग्दर्शक अद्याप निश्चित केलेला नाही.
सलमान आगामी सुलतान चित्रपटात हरियाणाचा कुस्तीपटू साकारत आहे. त्याचप्रमाणे सलमानच्या किक आणि दबंगचेही सिक्वेल येण्याच्या तयारीत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement