एक्स्प्लोर
सलमानचे सिनेमे आता ‘अमेझॉन प्राईम’वर
अभिनेता सलमान खानच्या सिनेमांचा चाहतावर्ग मोठा आहे. भारतासह जगभरात त्याचे चाहते आहेत. याच चाहत्यांना आता एक खुशखबर आहे. सलमानचे सिनेमे आता अमेझॉन प्राईमवर उपलब्ध होणार आहेत.
मुंबई : अभिनेता सलमान खानच्या सिनेमांचा चाहतावर्ग मोठा आहे. भारतासह जगभरात त्याचे चाहते आहेत. याच चाहत्यांना आता एक खुशखबर आहे. सलमानचे सिनेमे आता अमेझॉन प्राईमवर उपलब्ध होणार आहेत.
ऑनलाईन स्ट्रीमिंग प्रोव्हायडर अमेझॉन प्राईमसोबत अभिनेता सलमान खानने करार केला आहे.
सलमानच्या प्रत्येक सिनेमाची मोठी उत्सुकता त्याच्या चाहत्यांना असते. मात्र सलमानच्या सिनेमांसाठी चाहत्यांना वाट पाहावी लागणार नाही. कारण सलमानने त्याच्या आगामी सिनेमाचे हक्क अमेझॉन प्राईमला दिले आहेत.
केवळ आगामी सिनेमाचेच नव्हे, तर काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या ‘ट्युबलाईट’ सिनेमाचे हक्कही अमेझॉनला दिले आहेत. अमेझॉन प्राईमवर दोन महिन्यांसाठी सलमानच्या सिनेमांना विंडो मिळेल आणि तोपर्यंत कुठल्याही चॅनलवर तो सिनेमा दाखवला जाणार नाही.
काही दिवसांपूर्वीच सलमान खानने अमेझॉनसोबतच्या करारासंबंधी एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये गेम ऑफ थ्रोन्स आणि इतर हॉलिवूड सिनेमांच्या तुलनेत बॉलिवूड सिनेमांची तुलना केली होती.
https://twitter.com/BeingSalmanKhan/status/892001326996914178
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement