Salman khan :  बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) घरावर काही दिवसांपूर्वी गोळीबार झाला होता. त्यानंतर आता सलमानला जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याचं माहिती समोर येत आहे. त्याप्रकरणी मुंबईच्या साऊथ सायबर पोलीस स्थानकात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. बिष्णोई गँगशी संबंधित व्यक्तींनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ युट्युबवर पोस्ट केला होता. यामध्ये सलमानला जिवे मारण्यासंदर्भात धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. 


त्याचसंदर्भात सायबर पोलिसांनी 506 (2) भादवी कलमांसह 66 (ड) आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राजस्थानला एक पथक तपासासाठी पाठवले होते. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणात बनवारीलाल गुज्जर याला राजस्थानमधून अटक केली आहे. गुज्जरला आता मुंबईत आणलं जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


14 एप्रिल रोजी झाला होता गोळीबार


14 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांनी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर  गोळीबार केला होता. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. या घटनेची जबाबदारी तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचा भाऊ अनमोल बिष्णोई याने घेतली. घटनास्थळापासून काही अंतरावर पोलिसांना गुन्ह्यात वापरलेली दुचाकी सापडली होती. सीसीटीव्ही फूटेजमध्ये पोलिसांना आरोपींचे चेहरे दिसले. या घटनेच्या 72 तासांच्या आत मुंबई पोलिसांनी गुजरातमधून आरोपींच्या मुसक्या आवळल्या.  


अभिनेता लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या रडारवर का आला?


सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात लॉरेन्स बिष्णोईचा हात असल्याचं समोर आलं होतं. त्यातच आता हा धमकीचा कट देखील बिष्णोई गँगकडूनच झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान सलमान खान बिष्णोई गँगच्या रडारवर का आला याचा प्रश्न अनेकांना कायम पडतो.  राजस्थानमध्ये 'हम साथ-साथ है' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान 1998 च्या काळवीट हत्येप्रकरणी सलमान खानच्या कथित सहभागामुळे बिश्नोईने यापूर्वी धमकी दिली होती आणि हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. बिश्नोई समाजाने काळवीट  पवित्र मानले आहे. म्हणून, लॉरेन्स बिश्नोईनेदावा केला की तो तेव्हापासून अभिनेत्यावर नाराज आहे. तथापि, तपास संस्थांनी कोणत्याही टोळीप्रमाणे, बिश्नोई देखील बातम्यांमध्ये राहण्यासाठी आणि उच्च-प्रोफाइल लोकांना लक्ष्य करतात.   


ही बातमी वाचा : 


Sharad Pawar : दामोदर नाट्यगृहाच्या वादंगानंतर शरद पवार मैदानात; म्हणाले, 'नाट्यगृहांसाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे जाऊ...'