Salman Khan Alena Khalifeh Video Viral : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) मोठा चाहतावर्ग आहे. सलमान एक लोकप्रिय अभिनेता असला तरी आजही तो बॅचलर आहे. सलमानचं लग्न कधी होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान भाईजानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एलीना खलफीह (Alena Khalifeh) सलमानला लग्नाची मागणी घालताना दिसत आहे. 


एलीना खलफीह सलमानला प्रपोज करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एलीना सलमानला विचारत आहे,"मी हॉलिवूडवरुन खास तुझ्यासोबत बोलायला आली आहे. पाहताक्षणी मी तुझ्या प्रेमात पडले आहे". यावर उत्तर देत सलमान म्हणतो,"तू शाहरुख खानबद्दल बोलत आहेस ना? यावर एलीना म्हणते,"नाही.. मी तुझ्याबद्दल बोलत आहे. तू माझ्यासोबत लग्न करशील का? त्यावर सलमान म्हणतो,"आता लग्नाचे दिवस निघून गेले".  






सलमानने नकार दिल्यानंतर एलीनाने त्याला लग्नाला नकार देण्याचं कारण विचारलं. त्यावर सलमान म्हणाला,"तू मला 20 वर्षांपूर्वी भेटायला हवी होतीस". सलमानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 'आयफा 2023' (IIFA 2023) दरम्यानचा आहे. 


एलीना खलफीह कोण आहे? (Who Is Alena Khalifeh)


सलमानला लग्नाची मागणी घालणारी एलीना खलफीह (Alena Khalifeh) सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. दिसायला सुंदर असलेली एलीना खूप बोल्ड आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. इन्टाग्रामवर तिला 90.5k लोक फॉलो करतात. एके चॅट्स नावाचा तिचा शो आहे. 


सलमानचे आगामी सिनेमे... (Salman Khan Upcoming Project)


सलमानचा (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ka Jaan) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाने भारतात फक्त 101 कोटींचा गल्ला जमवला. त्याचा 'टायगर 3' हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. तसेच 'बजरंगी भाईजान 2'देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमानच्या आगामी प्रोजोक्टची चाहत्यांना आता प्रतीक्षा आहे. 


संबंधित बातम्या


Salman Khan : कॅफे, रेस्टॉरंट, जिम, जलतरण तलाव अन् बरचं काही; सलमान खान मुंबईत बांधणार 19 मजली हॉटेल!