The Kerala Story : गेल्या काही दिवसांपासून द केरळ स्टोरी (The Kerala Story) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट 5 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. अनेकांनी या चित्रपटावर टीका केली तर काही जण या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. आता प्रसिद्ध अभिनेते कमल हसन (Kamal Haasan) यांनी या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे. कमल हसन यांनी अबू धाबी येथील मुलाखतीमध्ये द केरळ स्टोरी हा चित्रपट प्रपोगंडा चित्रपट असल्याचं सांगितलं आहे. 


काय म्हणाले कमल हसल? 


आयफा पुरस्कार सोहळ्यात पत्रकारांशी संवाद साधताना अभिनेता  कमल हसन यांनी 'द केरळ स्टोरी' हा प्रपोगंडा चित्रपट असल्याचे म्हटले. ते म्हणाले, "मी प्रोपगंडा चित्रपटांच्या विरोधात आहे. चित्रपटाच्या पोस्टर खाली 'सत्य कथा' अशी टॅगलाइन लावल्यानं काही होत नाही. तो चित्रपट खरंच 'सत्य कथेवर आधारित'  असावा. पण त्यामध्ये खरं नाहीये" कमल हसन यांच्या या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


पाहा व्हिडीओ: 






'द केरळ स्टोरी' या सिनेमात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बलानी आणि सिद्धी इडनानी या अभिनेत्रींनी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटातील  अदाच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहेत.  अदानं या चित्रपटात शालिनी ही भूमिका साकरली आहे. शालिनी ही फातिमा कशी होते? हे द केरळ स्टोरी या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. 


सुदीप्तो सेन यांनी दिग्दर्शित केलेल्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाचं कथानक तीन मुलींवर आधारित आहे.  द केरळ स्टोरी या चित्रपटाचा विरोध काही राज्यांमध्ये करण्यात आला आहे तर काही राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. अनेक लोक या चित्रपटाला 'प्रपोगंडा  फिल्म' म्हणत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या:


The Kerala Story: 'प्रपोगंडा चित्रपट बनवून पैसे कमवू शकता, पण आदर नाही', नेटकऱ्याचं ट्वीट; अदा शर्माच्या रिप्लायनं वेधलं लक्ष