The Movies Trending On Netflix:  वीकेंडला ओटीटीवरील (OTT) चित्रपट आणि वेब सीरिज (Web Series) बघायला प्रेक्षकांना आवडतात.  नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ट्रेंड होणारे चित्रपट आणि वेब सीरिज पाहण्यास प्रेक्षक प्राधान्य देतात. तुमच्याकडे नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन असल्यास, तुम्ही या प्लॅटफॉर्मवरील ट्रेंडिंग चित्रपट पाहू शकता. 


'कटहल' (Kathal)


सान्या मल्होत्राचा 'कटहल'   हा चित्रपट नेटफ्लिक्सवरील ट्रेंडिंग चित्रपटांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. या चित्रपटात  फणस चोरीला गेल्यावर काय घडतं? ते दाखवण्यात आलं आहे. ते फणस सापडतात की नाही? ते फणस कोणी चोरलेले असतात? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला 'कटहल' या चित्रपटात मिळतील. हा चित्रपटातील कलाकारांचा कॉमेडी अंदाज तुम्हाला नक्कीच आवडेल.


'वीरूपक्ष (Virupaksha)'


 जर तुम्हाला हॉरर चित्रपट बघायला आवडत असतील तर तुम्ही वीरूपक्ष हा चित्रपट पाहू शकता.  हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.


'दसरा (Dasara)'


अभिनेता नानी आणि कीर्ती सुरेश  यांचा दसरा हा  हिट चित्रपट देखील नेटफ्लिक्सवर सध्या ट्रेंड होत आहे .   हा चित्रपट तेलगू भाषेत बनवला आहे. पण हिंदी भाषेमध्ये तुम्ही हा चित्रपट  नेटफ्लिक्सवर पाहू शकता. 


'भीड (Bheed)'


अनुभव सिन्हा दिग्दर्शित भीड हा चित्रपट नेटफ्लिक्सवर ट्रेंड होत आहे. वीकेंडला प्रेक्षक हा चित्रपट घरबसल्या पाहू शकतात.


'तू झूठी मैं मक्कार (Tu Jhoothi Main Makkaar)'


अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या  तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. आता हा चित्रपट नेटफ्लिक्सवर देखील ट्रेंड होता आहे. या चित्रपटात श्रद्धा आणि रणबीर यांचा रोमँटिक अंदाज तुम्हाला बघायला मिळेल. 


‘मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे’  (Mrs Chatterjee vs Norway)


 राणी मुखर्जीचा (Rani Mukerji)  मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे हा चित्रपट देखील तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. एक आई आपल्या मुलांसाठी कसा लढा देते? हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.


 'द मदर (The Mother)', मिसिंग (Missing), शहजादा (Shehzada) आणि ऑपरेशन मेफेयर (Operation Mayfair) हे चित्रपट देखील नेटफ्लिक्सवर ट्रेंड होत आहे. हे चित्रपट तुम्ही घरबल्या पाहू शकता. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Most Expensive Hindi Web Series: द फॅमिली मॅन ते मिर्झापूर; या वेब सीरिजच्या निर्मितीसाठी कोट्यवधींचा खर्च, जाणून घ्या बजेटबद्दल