एक्स्प्लोर

अरिजीतच्या माफीनाम्यानंतरही सलमानचा भेटीला नकार?

मुंबई : सुप्रसिद्ध पार्श्वगायक अरिजीत सिंहने सुपरस्टार सलमान खानसोबत दोन वर्षांपूर्वी झालेला वाद मिटवण्याच्या दृष्टीने पावलं उचलली. फेसबुकवरुन जाहीर माफी मागत अरिजीतने नमतं घेण्याचा प्रयत्न केला, मात्र सलमानने अरिजीतला माफ करण्याची तयारी दर्शवली नसल्याचं चित्र आहे.   सलमानच्या जवळचा मानला जाणारा अभिनेता निखिल द्विवेदीने याबाबत ट्विटरवर दावा केला आहे. 'सलमानने कोणत्याही गायकाचं गाणं सिनेमातून वगळण्यास सांगितलं नाही, मात्र त्याने अरिजीतची भेट नाकारली आहे.' असं ट्वीट निखिलने केलं आहे.     https://twitter.com/Nikhil_Dwivedi/status/735369018962546688   'मिड डे'च्या वृत्तानुसार 'सलमानने अरिजीतने गायलेल्या गाण्याच्या व्हर्जनवरच शूटिंग केलं आहे. असं असताना तो अरिजीतनेच गायलेलं गाणं चित्रपटातून वगळायला का सांगेल. संगीतकार अनेकदा वेगवेगळ्या गायकांच्या आवाजात गाणं रेकॉर्ड करतात. त्यापैकी उत्तम गाण्याची निवड अल्बमसाठी करतात. त्यामुळे सुलतानच्या बाबतीत बोलायचं तर कोणत्या गायकाचं गाणं निवडायचं आणि कोणत्या गायकाचं वगळायचं, हा सर्वस्वी संगीतकार विशाल-शेखर आणि निर्माते आदित्य चोप्रा यांचा निर्णय आहे.' असं सुत्रांनी म्हटलं आहे.     अरिजीतच्या माफीनाम्यानंतरही सलमानचा भेटीला नकार?   'मी सलमान खानचा अपमान केला नव्हता. ही गोष्टी मी त्याला हरतऱ्हेने समजवण्याचा प्रयत्न केला होता. अनेकदा मेसेज करुनही काहीच परिणाम झाला नाही. त्यामुळे फेसबुकवरुन सार्वजनिकरित्या माफी मागणं हा एकमेव पर्याय दिसत आहे' असं अरिजीतने आपल्या एफबी पोस्टमध्ये लिहिलं आहे. ही पोस्ट अरिजीतने नंतर फेसबुकवरुन डिलीट केली आहे.     'नीता यांच्या घरी मी केवळ तुमची माफी मागण्यासाठी आलो होतो. मात्र तुम्ही ऐकलं नाहीत. काही हरकत नाही. मी इथे सर्वांसमक्ष तुमची माफी मागतो. मात्र मी तुमच्यासाठी सुलतान चित्रपटात गायलेलं गाणं कृपया हटवू नका, अशी नम्र विनंती करतो. तुम्हाला हे गाणं दुसऱ्या गायकाकडून गाऊन घ्यायचं असेल, तर काहीही हरकत नाही, पण हे व्हर्जन राहू द्या.' असं अरिजीत प्रांजळपणे लिहितो.     'मी खूप गाणी गायली आहेत, मात्र निवृत्त झाल्यावर माझ्या संग्रहात तुमच्यासाठी गायलेलं एक तरी गाणं असावं, अशी माझी इच्छा आहे. प्लीज माझ्या या भावना माझ्याकडून हिसकावू नका. गैरसमजातून का असेना, माझ्यामुळे सलमानला अपमानास्पद वाटलं असेल, तर मी त्यासाठी जाहीर माफी मागतो' असं अरिजीतने लिहिलं आहे.   अरिजीतच्या माफीनाम्यानंतरही सलमानचा भेटीला नकार?

संबंधित बातम्या :

सलमान, माफ कर, 2 वर्षांपूर्वीच्या वादासाठी अरिजीतची माफी

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Embed widget