एक्स्प्लोर
Advertisement
नागराजसह आर्ची-परशाचा मनसेच्या चित्रपट सेनेत प्रवेश
सैराट सिनेमामुळे घराघरात पोहोचलेल्या दिग्दर्शक नागराज मंजुळे राजकीय पक्षाच्या जवळ गेला आहे.
मुंबई: सैराट सिनेमामुळे घराघरात पोहोचलेल्या दिग्दर्शक नागराज मंजुळे राजकीय पक्षाच्या जवळ गेला आहे. नागराज मंजुळेने राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचं सभासदत्व स्वीकारलं आहे.
केवळ नागराजनेच नाही तर सैराट सिनेमा गाजवलेला परशा अर्थात आकाश ठोसर आणि आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरुही ‘मनचिसे’चं सभासदत्व स्वीकारलं आहे.
बर्थडे स्पेशल: फॅण्ड्री ते बॉलिवूड व्हाया सैराट, नागराज मंजुळेचा प्रवास
या सर्वांनी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि सरचिटणीस शशांक नागवेकर, उपाध्यक्ष शर्वणी पिल्लई आणि उमा सरदेशमुख यांच्या उपस्थितीत चित्रपट सेनेचे सभासत्व स्वीकारले.
नागराजच्या सैराट सिनेमाने केवळ मराठी सिनेमाचं नव्हे तर बॉलिवूडचंही लक्ष वेधून घेतलं. अनेक भाषेत या चित्रपटाची निर्मिती झाली. नुकताच करण जोहरचा धडक हा सैराटचा हिंदी रिमेक येऊन गेला. या सिनेमालाही बॉलिवूडकरांनी दाद दिली. इतकंच नाही तर दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या सिनेमात महानायक अमिताभ बच्चन झळकणार आहेत.
नागराजचा फँड्री ते बॉलिवूड व्हाया सैराट हा प्रवास थक्क करणारा आहे. त्यामुळे सिनेइंडस्ट्रीमध्ये नागराजची क्रेझ सध्या पाहायला मिळत असताना, आता नागराजने मनसे चित्रपट सेनेचं सभासदत्व स्वीकारल्याने, राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
संबंधित बातम्या
नागराज मंजुळेच्या सिनेमात अखेर अमिताभ बच्चन परतले!
फॅण्ड्री ते बॉलिवूड व्हाया सैराट, नागराज मंजुळेचा प्रवास
'फँड्री', 'सैराट'वर आमीर फिदा, आता थेट नागराजसोबत काम करणार?
नव्या सिनेमासाठी नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओ पुन्हा एकत्र
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement