मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरात चाकुहल्ला करण्यात आला होता. त्याच्यावर तब्बल 6 चाकू वार झाले होते. दरम्यान, आता या अभिनेत्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. पोलिसांच्या कडक सुरक्षेत तो आता त्याच्या घरी पोहोचला आहे. मात्र घरात पाय ठेवताच त्याच्या सुरक्षेत मोठा बदल करण्यात आल्याचं म्हटलं जातंय. त्याला सुरक्षा देण्याची जबाबदारी आता नव्या सिक्योरिटी टीमला देण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. सैफच्या सुरक्षेसाठी ही टीम 24 तास पहारा देणार आहे. 


बड्या अभिनेत्याच्या एजन्सीकडे सुरक्षेची जबाबदारी?


मिळालेल्या माहितीनुसार आता सैफ अली खानच्या सुरक्षेची जबाबदारी आता अभिनेता रोनित रॉय याच्या एजन्सीकडे सोपवण्यात आली आहे. रोनित रॉयची सुरक्षा एजन्सी आता सैफ आली खानची 24 तास सुरक्षा करणार आहे. सैफ अली खान घरी पोहोचल्यानंतर त्याच्या घराच्या परिसरातील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. याच व्हायरल व्हिडीओंमध्ये अभिनेता रोनित रॉय वेगवेगळ्या सुरक्षा रक्षकांशी बोलताना दिसतोय. तसेच रोनित रॉय सैफच्या घराचीही पाहणी करताना दिसतोय. त्यामुळे रोनित रॉयच्या सुरक्षा पुरवणाऱ्या एजन्सीकडेच सैफ अली खान तसेच त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी देण्यात आल्याचे म्हटले जात आहे. एका व्हिडीओमध्ये रोनित रॉय माध्यम प्रतिनिधींशी बोलतानाद दिसतोय. तुम्हाला सैफ अली खानशी बोलायचं असेल तर कृपया थोडं मागे व्हा, असं रोनित माध्यम प्रतिनिधींना सांगताना दिसतोय. 


रोनित रॉय पोहोचला सैफच्या घरी


रोनित रॉय एक सुक्योरिटी एजन्सी चालवतो. बॉलिवुडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटी तसेच अन्य क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षा देण्याचं काम त्याची ही सिक्योरिटी एजन्सी करते. असे असताना रोनित रॉय सैफच्या घराबाहेर दिसलेला आहे. त्यामुळेच रोनित रॉयच्या एजन्सीवर सैफ आणि त्याच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे म्हटले जात आहे.  






16 जानेवारीच्या रात्री नेमकं काय घडलं होतं?


दरम्यान, सैफ अली खानवर 16 जानेवारी 2025 रोजी रात्री 2 वाजता हल्ला करण्यात आला होता. सैफच्या घरात घुसून एका व्यक्तीने हा चाकुहल्ला केला होता. यात सैफ चांगलाच जखमी झाला होता. त्यानंतर सैफला रिक्षामध्ये टाकून लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सैफच्या पाठीत हल्ला केलेल्या चाकुचा तुकडा घुसला होता. सैफला आता डिस्चार्ज मिळालेला आहे. त्याच्या पाठीवर तसेच त्याच्या मानेवर लागल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे या हल्ल्यातील आरोपीला पोलिसांनी अटक केलं आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. हा आरोपी मुळचा बांगलादेशचा असल्याचं म्हटलं जातंय. तो अवैध पद्धतीने भारतात घुसल्याचंही बोललं जात आहे. 


हेही वाचा :


अवघ्या 4 वर्षांत अमिताभ बच्चन मालामाल, आलिशान अपार्टमेंट विकून चक्क दुप्पट पैसे कमवले; विक्री किंमत वाचून थक्क व्हाल!


Gautam Adani Son Wedding : हिरे व्यापाऱ्याच्या 'किंग'ची लेक होणार गौतम अदाणींची सून, जाणून घ्या दिवा शाह नेमकी आहे तरी कोण? 


महाकुंभतील 'व्हायरल गर्ल' मोनालिसाला करायचंय बॉलिवूडवर राज्य; थेट ऐश्वर्या रायचं नाव घेत म्हणाली...