मुंबई : अमिताभ बच्चन हे नाव संपूर्ण भारताला माहिती आहे. वयाची ऐंशी पार केलेली असली तरी अजूनही ते बॉलिवुडमध्ये चांगलेच सक्रिय आहेत. भविष्यात त्यांचे अनेक मोठे चित्रपट येणार आहेत. अभिनयाच्या जोरावर ते आज कोट्याधीश झाले आहेत. दरम्यान, सध्या त्यांच्या एका आर्थिक व्यवहाराची चांगलीच चर्चा होत आहे. त्यांनी एक घर विकून खरेदी किमतीच्या तुलनेत थेट दुप्पट पैसे कमवले आहेत.
31 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं घर
मिळालेल्या माहितीनुसार अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील ओशिवारा परिसरात त्यांनी एक डुप्लेक्स अपार्टमेंट खरेदी केले होते. इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशनच्या (आयजीआर) संकेतस्थळानुसार अमिताभ बच्चन यांनी या अपार्टमेंटची 2021 साली 31 कोटी रुपयांना खरेदी केली होती. त्यानंतर आता त्यांनी हे घर विकले आहे. अवघ्या चार वर्षांत आता याच अपार्टमेंटची किंमत दुपटीपेक्षाही जास्त झाली आहे.
अमिताभ बच्चन यांनी कमवले तब्बल....
अमिताभ बच्चन यांनी चार वर्षांपूर्वी हे अपार्टमेंट खरेदी केले होते. आता याच अपार्टमेंटची किंमत तब्बल 83 कोटी रुपये झाली आहे. विक्रीआधी अमिताभ बच्चन यांनी हे अपार्टमेंट अभिनेत्री कृती सेनन हीला भाड्याने दिले होते. या अपार्टमेंटमध्ये राहण्यासाठी कृती सेनन महिन्याला 10 लाख रुपये भाडे द्यायची. आता मात्र अमिताभ बच्चन यांनी हे अपार्टमेंट विकले आहे. हा व्यवहार जानेवारी 2025 मध्ये पार पडला आहे. त्यासाठी 4.98 कोटी रुपये स्टँप ड्युटी आणि 30 हजार रुपये रजिस्ट्रेसन फी भरण्यात आली आहे. म्हणजेच अमिताभ बच्चन यांनी हे अपार्टमेंट विकून साधारण 52 कोटी रुपये कमवले आहेत.
जलसा घराची किंमत 112 खोटी रुपये
दरम्यान, अमिताभ बच्चन हे करोडपती आहेत. त्यांचा मुंबईतील अत्यंत महागडा म्हटल्या जाणाऱ्या जुहू या भागात जलसा नावाचा मोठा बंगला आहे. या घराची किंमत जवळपास 112 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. त्यांच्याकडे अनेक महागड्या कार आहेत. यामध्ये रेंज रोव्हर, रोल्स रॉयसी, ऑडी अशा कारचा मावेश आहे.
हेही वाचा :
महाकुंभतील 'व्हायरल गर्ल' मोनालिसाला करायचंय बॉलिवूडवर राज्य; थेट ऐश्वर्या रायचं नाव घेत म्हणाली...
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी