मुंबई : बडे उद्योगपती गौतम अदाणी यांचे पुत्र जीत अदाणी यांचा विवाह येत्या 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे. खुद्द गौतम अदाणी यांनीच याबाबत माहिती दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या लग्नाची देशभरात चर्चा होती. हा विवाहसोहळा कधी संपन्न होणार, असे विचारले जात होते. असे असतानाच आता या लग्नाची थेट तारीख समोर आल्याने जीत अदाणी यांच्या पत्नीचा मान मिळवणारी मुलगी नेमकी कोण आहे? असे विचारले जात आहे.
जीत अदाणी यांचा विवाहसोहळा साध्या पद्धतीने होणार
जीत अदाणी यांच्या विवाहसोहळ्याविषयी गौतम अदाणी यांनी सविस्तर माहिती दिली आहे. ते 21 जानेवारी 2024 रोजी प्रयागराज येथे कुंभमेळ्यात आले होते. तेथे त्यांनी सेवाकार्यही केले. यावेळी जीत अदाणीदेखील गंगामातेचे आशीर्वाद घेण्यासाठी कुंभमेळ्यात आले होते. यावेळी गौतम अदाणी यांनी जीत अदाणी यांचा विवाह 7 फेब्रुवारी रोजी होणार असल्याचं सांगितलं. तसेच हा विवाहसोहळा भारतीय परंपरेप्रमाणे होणार आहे. साध्या पद्धतीने कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न होईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
कोण होणार जीत अदाणी यांची पत्नी?
जीत अदाणी यांच्या होणाऱ्या पत्नीचे नाव दिवा जैमीन शाह असे आहे. या दोघांचा साखरपुडा 12 मार्च 2023 रोजी झाला होता. गुजरातमध्ये हा साखरपुडा पार पडला होता. साखरपुडा होऊनही या दोघांनीही आपले नाते सार्वजनिक केले नव्हते. आता मात्र त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. दिवा शाह यांचे पिता जैमीन शाह हे हिऱ्याचे मोठे व्यापारी आहेत. त्यांच्याविषयी अधिक माहिती उपलब्ध नाही. मात्र दिवा शाह या कोट्यवधी रुपयांची मालकीण असल्याचं म्हटलं जातं. ती तिचे वडील जैमीन शाह यांना त्यांच्या उद्योगांत मदत करते. जैमीन शाह हे C. Dinesh & Co. Pvt. Ltd या कंपनीचे संचालक आहेत. या कंपनीची सुरुवात चिनू दोशी, दिनेश शाह यांनी केली होती.
हेही वाचा :
दिग्गज उद्योगपती सपत्नीक कुंभमेळ्यात, सेवाकार्यात सहभाग, भाविकांना प्रसादही वाटला!
Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding : अंबानींच्या सुनेच्या या गोष्टी माहीत आहेत का?