Saif Ali Khan Joins NTR 30:  दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता ज्युनिअर  एनटीआरच्या (Jr NTR) आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. त्याच्या आरआरआर (RRR) या चित्रपटांला भारतातीलच नाही तर परदेशातील प्रेक्षकांची देखील पसंती मिळाली. लवकरच त्याचा 'एनटीआर 30' (NTR 3O)  हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.या चित्रपटात बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर  (Janhvi Kapoor) देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. ज्युनिअर  एनटीआर आणि जान्हवी कपूर यांच्या 'एनटीआर 30' या चित्रपटात एका बॉलिवूड अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. सैफ अली खान (Saif Ali Khan) हा हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता 'एनटीआर 30' या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे.


एनटीआर आर्ट्सच्या ट्विटर अकाऊंटवर नुकतेच काही फोटो शेअर करण्यात आले आहेत.या फोटोमध्ये ज्युनिअर  एनटीआरसोबत अभिनेता सैफ अली खान दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देण्यात आले, 'टीम एनटीआर 30 सैफ अली खानचे स्वागत करत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता हाय व्होल्टेज अॅक्शन ड्रामाच्या शूटमध्ये सामील झाला. आहे'. सैफ अली खान  हा  एनटीआर 30 या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे. एनटीआर 30 या चित्रपटात सैफ आणि ज्युनिअर  एनटीआर यांचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुकत आहेत.  एनटीआर 30  या चित्रपटात सैफ अली खान हा खलनायकाची भूमिका साकारणार आहे, असं म्हटलं जात आहे.  






एनटीआर 30  या चित्रपटातील सैफ अली खानच्या भूमिकेबाबत अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच या चित्रपटाची रिलीज डेट देखील अजून जाहीर करण्यात आलेली नाही.


सैफ अली खानचा आगामी चित्रपट


सैफ अली खानचा (Saif Ali Khan)  'आदिपुरुष' हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात क्रिती सेनन, प्रभास आणि  सनी सिंह हे देखील प्रमुख भूमिका  साकारणार आहेत. या चित्रपटामधील सैफच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले होते. सैफ अली खानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Janhvi Kapoor Happy Birthday: वाढदिवसाला जान्हवीनं दिलं चाहत्यांना गिफ्ट; शेअर केला NTR 30 मधील लूक, ज्युनिअर एनटीआरसोबत करणार काम